#जैवविविधता दिन 22 मे 2024
#जैवविविधता दिन 22 मे 2024,पाया समृद्ध जीव सृष्टीचा
मानव वंश टिकवायचा असेल तर #जैवविविधता राखली पाहिजे
#जैवविविधता दिन 22 मे 2024 सौरमालेत आजच्या घडीला तरी फक्त आपल्या पृथ्वीवरच सजीव सृष्टी आहे.ब्रम्हांडासाठी जरी अनंत कोटी हा शब्द वापरात असला तरी दुसरे ब्रम्हांड व दुसरी पृथ्वी सध्यातरी आपल्या दृष्टीपथात नाही. 22 मे हा दिवस जागतिक स्तरावर जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो.पर्यावरण हा शब्द तसा आता सर्व परिचित झाला आहे पण परिसंस्था ,जैवविविधता याबाबतीत तेवढी जागरूकता नाही.परिसंस्था ,जैवविविधता हे दोन्ही घटक पर्यावरणाशी साधर्म्य सांगणारी असली तरी जैवविविधता हा खूप मोठा व व्यापक घटक आहे.

#जैवविविधतेचा साधा सोपा अर्थ म्हणजे सजीवास जगण्यास निसर्ग निर्मित अनुकूल, योग्य परिस्थिती असणे.तसेच जैविक व अजैविक घटकांचा योग्य मेळ असणे. उदा.मासा हा पूर्णतः जलचर प्राणी आहे.तो जगण्यासाठी पाणी ही सर्वात प्रथम गरज आहे.तसेच हे पाणी ऑक्सिजनयुक्त राहण्यासाठी तिथं जलीय वनस्पती असणं आवश्यक आहे.शत्रूपासून बचाव होण्यासाठी पाण्यास खोली आवश्यक आहे.
#जैवविविधता दिन 22 मे 2024 जैविक घटकांचे महत्त्व विशद करतो.
#जैवविविधता दिन 22 मे 2024. #जैवविविधतेत सजीवांचे अनुकूलन ,प्रतिकूलन यासोबतच सजीव निर्जीवांचा परस्परांवर होणारा परिणाम यांचाही अभ्यास येतो.नदी वाहती राहण्यासाठी व नदीपात्र स्वच्छ राहण्यासाठी नदीपात्रात वाळू असणं अत्यंत आवश्यक आहे. बेसुमार वाळू उपसा म्हणजे नदीची रोज थोडी थोडी हत्याच आहे.आज रोजी नद्या मृत्यूशय्येवर शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यांच्या कुडीतून प्राण कधीही जाऊ शकतो.
#जैवविविधता दिन 22 मे 2024
सजीवांचे तीन जीव सृष्टीत वर्गीकरण केले जाते.वनस्पती , प्राणी व सूक्ष्मजीव हे सजीवांचे तीन मुख्य प्रकार आहेत.पुन्हा यांचे पोट प्रकार व भेद खूप आहेत.पण कोणताही सजीव या तीन गटातच येतो.पक्षी हा सजीव गट मोठा असला तरी तो प्राणी या गटातच येतो.उत्क्रांत टप्प्यात पक्ष्यांच्या अग्र पादांचे रूपांतर पंखात झालेले आहे.वनस्पती,प्राणी व सूक्ष्मजीव यांचेही अभ्यासासाठी विस्तृत वर्गीकरण केलेले आहे.हे वर्गीकरण करताना सजीवाचा आढळ,आकार,वय,अधिवास,गुणधर्म,आहार ,प्रजनन,इत्यादी आधार विचारात घेतलेले आहेत .उदा.अंडी देणारे प्राणी,पिल्ले देणारे प्राणी.पाठीचा कणा असलेले प्राणी,पाठीचा कणा नसलेले प्राणी.इत्यादी इत्यादी प्रकार पडतात.विस्तारभयास्तव व मुख्य विषयावरील लक्ष्यबिंदू विचलित होऊ नये म्हणून ते सर्व मांडत नाही.जैवविधिता म्हणजे एका ठराविक प्रदेशात नैसर्गिक अनुकुलतेमुळे जास्तीत जास्त सजीवांना आपले आयुष्य जगता येणे.सजीवाला जीवनक्रम व्यतीत करताना फारसे कष्ट पडत नाहीत,ती जैवविविधता श्रेष्ठ समजली जाते.
विषुववृत्तीय प्रदेशात व विषुववृत्ताच्या नजीकच्या दोन्ही बाजूला जैवविविधता वरच्या स्तरातील आहे.लहान वेली,मोठी वृक्ष,गवत ,मुबलक पाणी ,शुद्ध हवा,हत्ती,जिराफ,वाघ ,सिंह असं सर्व काही समृद्ध सृष्टी वैभव विषुवृत्ताजवळ आढळते. कमी पर्जन्य व वाढती उष्णता यांमुळे जसं जसं विषुवृत्तापासून दूर जावे,तशी जैवविविधता कमी कमी होत जाते.वाळवंटी प्रदेशात जैवविविधतेस फार कमी वाव असतो.ध्रृवीय टोकाला तर थोडेफार केसाळ प्राणी व खुरटी वनस्पती वगळता जैवविविधता जवळपास गोठलेलीच असते.जैवविविधता दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे जैवविविधता समस्याबद्दलची समज व जागरूकता वाढावी. यासाठी शाळा , महाविद्यालय,विद्यापीठ, पर्यावरण संस्था यांचेमार्फत जन जागृती व जबाबदारी जाणीव वाढवायला हवी.
#जैवविविधता 22 मे 2024
सजीव सृष्टीत प्राणी म्हणून मानवाचा उदय खूप अलीकडचा आहे पण धाकट्या शेंडीफळाने लाडात वाढून , पोशिंद्या जन्मदात्याच्या नरडीचा घोट घेऊन कुटुंबच उद्धवस्त करावं ,असंच नातं मानवाकडून जैवविविधतेच्या बाबतीत मायबाप निसर्गाशी निभावले जात आहे.
सजीव सृष्टीचे दीर्घ आयुष्य हे सजीवास उपलब्ध नैसर्गिक आहार व विहार यावर ठरत असते.चैनीची जीवनशैली जोपासताना मानवाने स्वनिवारा अति भक्कम केला.अन्नाच्या बाबतीत आपण निसर्गसाखळीत परपोषी आहोत ;पण आपला तोरा स्वयंपोषीचा आहे.हावरटपणाने निसर्ग वापरल्यामुळे नदी ,तलाव ,जंगल अशा परिसंस्था आपल्याकडून नष्ट झाल्यात किंवा शेवटच्या घटिकेवर आहेत.ज्यांनी ऑक्सिजन द्यायचा तेच ऑक्सिजनवर आहेत.अन्नसाखळी व अधिवास सुरक्षितता संवर्धित झाली तरच जैवविविधता टिकत असते.प्राण्यांच्या अन्नसाखळीवर माणसांकडून हल्ला झाला आहे.पावसाळ्यात डराव डराव करणारा बेडूक ,पावसाळ्याच्या सुरुवातीला दिसणारा रंग बदलणारा सरडा ,दारात चिवचिवाट करत नृत्य करणारी चिमणी कुठे आहे ? अशात किती वर्षांपासून ससा,लांडगा,कोल्हा दिसलाच नाही.याची आठवण आहे का ?
भोवतालच्या माणसांमुळे आपले सामाजिक जीवन सुरक्षितपणे व्यतित होत असले तरी आपलं जगणं समृद्ध करणारा अजूनतरी निसर्ग हाच एकमेव तारणहार आहे.हवा,पाणी व अन्नासाठी आपण पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहोत.व निसर्गाची सुदृढता संतुलित जैवविविधतेवर अवलंबून आहे.त्यामुळे आपण #जैवविविधतेशी कृतज्ञ राहायलाच हवं.#जैवविविधता राखली तरच मानवी वंश टिकेल.
#जैवविविधता दिन 22 मे 2024
वनस्पतीवर जगणारे प्राणी, वनस्पतीं ज्यांचा आहार आहे ते प्राणी सुद्धा कोणाचातरी घास असतातच .मांसाहारी प्राणी दहशतवादी असले तरी त्यांच्याही कलेवरावर जगण्यासाठी गिधाडवर्गीय टोळी असतेच.मृतांवर जगणारा खूप मोठा कीटक वर्ग निसर्गात असतोच.वनस्पती जगतातही सूक्ष्मकाय तंतूमय वनस्पती ते महाकाय वृक्षराजी अशी वर्गवारी आहेच.वनस्पतींच्या पानाआड असलेले कीटक,आळ्या पक्षांचे अन्न आहे.पक्षी झाडांना कीड्यामुंग्यांपासून वाचवतात त्या बदल्यात झाड त्यांना निवारा देतं.अन्न देतं.
हवा ,पाणी,सूर्य प्रकाश ,मृदा या निर्जीव संपदेने आपल्याला जिवंत ठेवलं आहे.हवा,पाणी, सूर्यप्रकाश,माती,दगड यांना स्वतंत्र जीव नाही.पण माणसाचा जीव हवा, पाणी माती यांच्याशिवाय जीवित राहू शकत नाही.मानवाच्या कित्येक पिढ्या यांनीच पोसल्या आहेत व पुढेही त्यांच्याकडूनच आपल्या वंशाचं जीवीत्व राखलं जाणार आहे.आपलं काम एकच जैवविविधतेच्या सूत्राची मोडतोड न करणं.निसर्ग आपली माता आहे.

वाहनांच्या धडकेत माणुस जखमी झाला अथवा ठार झाला तर माणुस म्हणून आपण खूप हळहळ करतो.अपघाताने दहाबारा किंवा शेकड्याने माणसं गमविली तर ही हळहळ जगभराचा विषय बनते.परंतु प्राणी,पक्षी थव्याने मरतात तेव्हा जैवविविधतेतील महत्वाचा घटक कमी झालाय ? असं किती जणांच्या मनात येतं ?
एखादे झाड नष्ट झाले तर कित्येक पशूपक्षांचा निवारा,अन्न पोशिंदा धारातीर्थी पडत असतो.एवढेच नव्हे तर ठराविक अंतराने जमिनीवर असलेल्या झाडांत जमिनीखाली मुळांची एक साखळी असते.एखादा वृक्ष तोडला जातो तेव्हा मुळांची साखळी तुटुन शेजारची झाडे मृत्यूपंथाकडे प्रवास करू लागतात.एखादे झाड नष्ट होणे म्हणजे एक परिसंस्था नष्ट होणे होय.#जैवविविधतेत परिसंस्थेला खूप महत्त्व आहे.
#जैवविविधता दिन 22 मे 2024.
2001 पासून जागतिक स्तरावर नियमितपणे जैवविविधता दिन साजरा करण्यात येतो.दरवर्षी वेगवेगळी थीम घेऊन काम केले जाते.यावर्षीची थीम आहे…योजनेचा भाग व्हा.म्हणजे जैवविविधता राखण्याच्या केवळ गप्पा न करता जैवविविधता राखण्याच्या मोहिमेत स्वतः सहभागी व्हायला हवं.
नाहीतर एक दिवस ती म्हण खरी होईल…
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ . कारण जैवविविधतेलं एक अपत्य माणुसही आहेच ना.जैवविविधतेला माणसानंच ना लावलं आहे म्हणून माणसांचं जैवविविधता राखायला हवी.
अन्नसाखळी वाचवू . पर्यावरण वाचवू जैव विविधता वाचवू….
#जैवविविधता दिन 22 मे 2024
कचरू चांभारे बीड
9421384434
RELATED POSTS
View all