वेडात मराठे वीर दौडले सात 24 फेब्रुवारी

वेडात मराठे वीर दौडले सात 24 फेब्रुवारी युद्ध वर्ष 351 प्रतापराव गुजर नेसरी खिंड

वेडात मराठे वीर दौडले सात 24 फेब्रुवारी

वेडात मराठे वीर दौडले सात 24 फेब्रुवारी


वेडात मराठे वीर दौडले सात 24 फेब्रुवारी
नेसरी खिंडीत अजरामर झाले वीर प्रताप

नेसरी पावन खिंड

वेडात मराठे वीर दौडले सात 24 फेब्रुवारी

पराक्रमी यादव घराण्याची व विजयनगर साम्राज्याची सत्ता संपल्यानंतर अनेक वर्षे मराठी राज्य व मराठी राजा निर्माण झाला नाही.दक्षिणेतल्या सत्ताधीश शहांसाठी व उत्तरतेल्या मोगल बादशहासाठी महाराष्ट्रातील मराठा सरदार पराक्रम गाजवत होते. यांतल्या काही सरदारांना यवनी सत्तेत महत्त्वाची लष्करी पदे होती,किताब पदव्या,जहागिरीही होत्या.

वेडात मराठे वीर दौडले सात 24 फेब्रुवारी

काहींना राजेपदही होते पण यासर्व प्रकारावर गुलामीचे पांघरून होते.मराठा तलवारीचे पाणी स्वतंत्र नव्हते. ते अंकित वा आश्रीत होते. सतराव्या शतकात छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण केले .महाराज विधिवत सार्वभौम राजा छत्रपती झाले.छत्रपती शिवरायांनी आपला राज्याभिषेक करून घेतला ते साल होते जून 1674 .

राज्याभिषेकाची जय्यत तयारी सुरू असताना ,मराठी मन आनंदाच्या परमोच्च उधानात असताना अवघ्या चार महिने आधी स्वराज्यात प्रचंड मोठी दुःखद घटना घडली.त्या घटनेची तारीख होती 24 फेब्रुवारी 1674 .

वेडात मराठे वीर दौडले सात 24 फेब्रुवारी

ती घटना म्हणजे वेडात मराठे वीर दौडले सात.नेसरी खिंडीत घडलेल्या लढाईत स्वामीनिष्ठ सेनापती प्रतापराव गुजर व सहा धाडसी मावळे सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे, विठ्ठल आत्रे,कृष्णाजी भास्कर,विसोजी बल्लाळ,दीपाजी राऊतराव यांना वीरमरण आले. सैनिकी संख्येची तुलना करताना नेसरी खिंडीतली लढाई प्रचंड विषम होती.

सरसेनापती प्रतापराव गुजरांसह अवघे सात मावळे आदिलशाही सरदार बहलोलखानाच्या पंधरा हजार सैनिकांच्या छावणीवर तुटून पडले होते.पराक्रमाची अशी शर्थ झाली जिथं वीरांच्या हालचालींनी उधळलेल्या मातीचे मेघ झाले व क्षितिजावर झुंजार रक्ताची लाली चढली.या महान पराक्रमाचा आज स्मृतिदिन.


नेसरी खिंडीतला पराक्रम समजून घेताना त्याआधीचा घटनाक्रम समजून घेणे महत्त्वाचे आहे.इतिहास हा एखाद्या घटनेपुरता नसतो तर त्या घटनेमागची साखळी समजून घेतली म्हणजे मुख्य घटनेची कडी उलगडत असते.

वेडात मराठे वीर दौडले सात 24 फेब्रुवारी


चारही बाजूंनी मातब्बर शत्रू सागर असतानाही सर्वांचे मधोमध शिवरायांनी स्वराज्य नावाचे पराक्रमाचे बेट निर्माण केले व हे बेट पुढे रयतेचे राष्ट्र बनले.

स्वराज्य राष्ट्र निर्माणात छत्रपती शिवराय हे नेतृत्व होते तर त्याचवेळी मिळालेले स्वामीनिष्ठ सरदार मावळेही तितकेच महत्त्वाचे होते.नेतोजी,तानाजी,बाजी,मुरारबाजी अशी एक लांबलचक पराक्रमाची शौर्यगाथा आहे.यांतलं एक पान प्रतापराव गुजरांचे आहे.


सरसेनापती होण्यापूर्वी पासूनच प्रतापराव महाराजांचे महत्त्वाचे सरदार होते.प्रतापरावांचे खरे नाव कडतोजी .पण अनेक पराक्रमाचे कौतुक करताना खुद्द छत्रपतींनीच त्यांचे नाव प्रतापराव ठेवले.प्रतापराव अनेक लढायांत शिवरायांसोबत होते व कैक मोहिमा त्यांना स्वतंत्रही सांगितलेल्या होत्या.अगदी लहान वयात बाळ शंभूराजे मोगलशाहीचे मनसबदार म्हणून गेले तेव्हा प्रतापराव शंभुरायांसोबत होते.

एकदा तर पराक्रमाची हद्दच झाली.मिर्झाराजे जयसिंग व छत्रपती शिवराय यांच्या तहाच्या वाटाघाटी चालू असताना प्रतापरावांनी थेट मिर्झाराजेवरच हल्ला केला होता.महाराज आग्रा येथे कैदेत अडकून पडले तेव्हा स्वराज्यात प्रतापरावांना संरक्षणसिद्ध ठेवलेले होते.प्रतापराव गुजरांच्या नावे एक फार मोठा पराक्रम आहे.तो घडला होता कांचनबारी घाटात.शिवरायांनी दुसऱ्यांदा सुरतेवर हल्लाबोल करून हाती लागलेली संपत्ती रायगडाकडे कूच करत असताना ब-हाणपूर येथील मोगल सुभेदारास कुणकुण लागली व त्याने रातोरात मजल मारत कांचनबारीजवळ शिवरायांना गाठले.

वेडात मराठे वीर दौडले सात 24 फेब्रुवारी

कांचनबारीत समोरासमोर लढाई झाली.स्वराज्याचे मावळे प्रथमच समोरासमोरच्या मैदानी लढाईला सामोरे गेले.पराक्रमाची शर्थ झाली.ही लढाई प्रतापरावांच्या नेतृत्त्वात झाली.दुसरी एक अशीच. घनघोर लढाई साल्हेर मुल्हेर परिसरात झाली होती.चाळीस हजार फौजेचा व मोगल सेनापती बहादूर खान,दिलेरखान, इखलासखान यांचा धुव्वा उडवत मोरोपंत पिंगळे व प्रतापराव गुजर यांनी मोगली फौजेची दाणादाण उडविली होती.या विजयाची वार्ता धावत येऊन सांगणाऱ्या जासुदास महाराजांनी सोन्याचे कडे भेट दिले होते.यावरून या लढाईचे महत्त्व लक्षात येते.

एकदा तर प्रतापरावांनी स्वतंत्र मोहीम राबवून लाड कारंजा व बऱ्हाणपूरवर हमला करून येथून चार हजार बैलावर पाऊणकोटीची संपत्ती आणली होती.
प्रतापरावांच्या प्रतापाचा आलेख सातत्याने वाढतच होता.नेतोजी पालकरानंतर 1668 साली प्रतापराव स्वराज्याचे सरसेनापती बनले.

1670 नंतर महाराजांनी मोगली प्रांतावर चौफेर हल्ले सुरू केले व तहात गेलेले किल्ले प्रांत घेण्यास सुरुवात केली.


वेडात मराठे वीर दौडले सात 24 फेब्रुवारी

चार वर्षात महाराजांनी प्रचंड मोठा मुलुख स्वराज्यात सामील केला.यादरम्यान आदिलशाही बरीचशी खिळखिळी झाली होती पण पूर्णतः संपलेली नव्हती.विजापूरकर आदिलशाही सरदार बहलोलखान स्वराज्यावर चालून येत होता.विजापूरकरांच्या सीमेवर सांगली मिरज भागातील उमराणी गावाजवळ प्रतापराव गुजर व बहलोलखानाची गाठ पडली. घमासान लढाई झाली.बहलोलखान शरण आला. यापुढे स्वराज्याची कुरापत न काढण्याचा दम देऊन प्रतापरावांनी बहलोलखानाला अभय देऊन जिवंत जाऊ दिले.

वारंवार कुरापती काढणारा बहलोलखान शांत बसणारा नव्हता ,हे महाराज जाणून होते.त्यामुळे बहलोलखानास सोडणे महाराजांना आवडले नाही.
नव नियोजित राजधानी रायगडावर राज्याभिषेक तयारी सुरू असताना महाराज पन्हाळागडावर होते.तेव्हा बहलोलखान स्वराज्यावर चालून येत असल्याचे हेरांकडून कळले.महाराजांनी प्रतापरावास निरोप पाठविला का हा खान वरचेवर तोशिस देतो आहे.राज्याभिषेक समयी याची वळवळ नको.लष्कर घेऊन जावे व त्यास गर्दीस मिळवावे अन्यथा आम्हास तोंड दाखवू नये.बहलोलखानास आता जिवंत सोडायचे नाहीच या इराद्याने प्रतापराव पेटले होते.

राज्याभिषेक तयारीची धांदल होतीच.सार्वभौम राजा शिवछत्रपतींचे दर्शन घेण्यास मराठी मन आतुर झालेले होते.बहलोलखानाचा सोक्षमोक्ष लावूनच रायगड गाठायचा अशी खुणगाठ प्रतापरावांनी मनाशी बांधली होती.तोच एके दिवशी बहलोलखान नेसरी खिंडीच्या पलीकडील बाजूस तळ ठोकून असल्याची बातमी प्रतापरावांना कळली.प्रतापराव तेव्हा सहा मावळ्यांसोबत नेसरी खिंडीजवळ अलिकडे होते.

वेडात मराठे वीर दौडले सात 24 फेब्रुवारी
वेडात मराठे वीर दौडले सात 24 फेब्रुवारी

शौर्य शिपाईपणाची भावना इतकी तीव्रपणे वाढली की आपण स्वराज्याचे सरसेनापती आहोत हे ते विसरूनच गेले.फौजेनिशी आक्रमण करण्याचे ध्यानही त्याच्या मनी उरले नाही.सोबतच्या सहा मावळ्यांसह सातवा सेनापती तलवारीचे पाते सळसळ उसळवित पराक्रमाच्या वेडात हे मराठा वीर दौडले.घोड्यांचा टापाचा आवाज व उडालेला धुराळा पाहून बेसावध असलेला बहलोलखान मनातून हादरलाच पण धुराळ्याचे मेघ जसे जसे जवळ आले तसं लक्षात आले की हे सातच आहेत.अभय मिळालेला बहलोलखान सारे विसरून मरणावर तुटून पडलेल्या सात वीरांवर चालून गेला.

खानाची फौज पंधरा हजाराची.पण तरीही हे सात मराठा वीर त्वेषाने तुटून पडले.धुळीचे लोट अन् रक्ताचे पाट यांनी नेसरी खिंड काळवंडली.बघता बघता मारिता मारिता नव निर्माणाचे गीत गाणाऱ्या स्वराज्याचा सरसेनापती धारातीर्थी पडला.
तानाजीनंतर अवघ्या चारच वर्षात महाराजांचा दुसरा तानाजी पडला होता.

महाराजांना अतिव दुःख झाले.शब्दाचा अर्थ असा कसा घेतला .म्हणून खूप कष्टी झाले.
घोडखिंडीत बाजीप्रभू पावन झाले.कोंढाणा किल्ला तानाजीने तर पुरंदरचा रणसंग्राम मुरारबाजीने अजरामर केला.नेसरी खिंड प्रतापराव गुजरांनी पावन केली.धन्य धन्य होते ते प्राणांची बाजी लावणारे मावळे व धन्य धन्य होते छत्रपती शिवराय.
कचरू चांभारे
मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा मन्यारवाडी ता.जि. बीड 9421384434

वेडात मराठे वीर दौडले सात 24 फेब्रुवारी

12 thoughts on “वेडात मराठे वीर दौडले सात 24 फेब्रुवारी”

  1. प्रतापरावांच्या पराक्रमावर कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेले, वीररसयुक्त “वेडात मराठे वीर दौडले सात” हे गीत ऐकतांना
    डोळ्यापुढे तो प्रसंग येतो. प्रतापरावांचा इतिहास आज परत आपल्या लेखणीने जीवंत केलंत गुरूजी. खूप ताकदीचा लेख. स्वराज्यावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरची ही
    अव्यभिचारी निष्ठा व प्रेम
    साऱ्याच मावळ्यांची, ऐकून वाचून, म्हणावंसं वाटतं, खरंच धन्य ते सेनापती, मावळे आणि धन्य ते राजे !!!!
    सर्वांना मानाचा मुजरा आणि सलाम आपल्या लेखाला 🙏🏼💐

    Reply
  2. छान सर, वाचत असताना अंगावर शहारे आले, तुम्ही इतिहासाचे लिखाण करत नाही तर इतिहास आपल्या शब्दातून जागवत असता, असेच दर्जेदार शब्द महिफीलची मेजवानी आम्हाला भेटत जावो 💐💐🙏

    Reply
  3. कचरोजी राजे ऐतिहासिक वर्णने.. संदर्भाची मेजवानी देऊन करताना आपली लेखणी चांगलीच परजून नुसती चमकत नाही ..तर तळपते आणि या प्रसंगी आपण साक्षीदार आहोत असा भाव वाचकांत आणते.अप्रतिम लेखन …वीरगती प्राप्त लढवय्या आपल्या सर्वांच्या वंदनीय पूर्वजांना…..मनाचा मुजरा.. साष्टांग दंडवत…

    Reply

Leave a Comment