अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय वैजयंता 2024

अण्णा भाऊ साठे – पुस्तक परिचय वैजयंता 2024

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. महापुरूषांच्या जयंती पुण्यतिथी औचित्याने त्या त्या महापुरूषांचे चरित्र, लेखन वाचायचे हा माझा वीस पंचवीस वर्षापासूनचा शिरस्ता आहे.अण्णा भाऊंच्या जयंती दिनी मी वैजयंता ही कादंबरी एकाच बैठकीत वाचून पूर्ण केली व दुसऱ्या दिवशी माकडीचा माळ ही कादंबरी वाचून पूर्ण केली.

अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय वैजयंता 2024


अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय वैजयंता 2024 अण्णा भाऊंच्या वैजयंता कादंबरीची ओळख करून देण्यासाठी आजचा ब्लॉग लिहित आहे.अमोघ प्रतिभेचे धनी असलेल्या साहित्यसम्राट, लोक साहित्यिक, लोक शाहीर अण्णा भाऊंच्या कोणत्याही साहित्याची मी ओळख करून द्यायची गरजच नाही, त्यांचे साहित्य आधीच जनमाणसात ,पर प्रांतात अगदी परदेशातही पोहचले आहे.त्यांचे लेखन कसदार,सत्याला धरून,पिडितांच्या वेदनेचा हुंकार दखलपात्र करणारं आहे.
अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या कथा कादंबरीत सोशिक पण निर्भय स्त्री जीवन आहे.वैजयंता ही कादंबरी एका तमाशा कलावंतीणीची आहे. तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे.कलेची कदर तमाशा खेळात होते पण कलेची अदाकरी संपल्यावर फडात व फडाच्या पलीकडे कलावंतांचे काय ? त्यातही स्त्री कलाकाराचे काय ? अण्णा भाऊंचे लेखन म्हणजे मुख्य विषयाला धरून अनेक उप विषयावर भाष्य करणं व या मिलाफातून त्यावेळची परिस्थिती मांडणं.अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय वैजयंता 2024
अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय वैजयंता 2024 ही कादंबरी मुळ स्वरूपात किती पानांची व तिची प्रकाशन संस्था कोणती ? हे मला माहीत नाही कारण ही कादंबरी मी अण्णा भाऊंच्या समग्र वाड•मयातून वाचलेली आहे. समग्र वाड्गमयात ती 112 पानांची आहे.


अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय वैजयंता 2024 वैजयंता ही गजराबाई या तमासगीर स्त्री कलावंताची मुलगी. गजराबाई एके काळची अजोड तमाशा कलावंत.रूप व नृत्याचा सर्वांग सुंदर गोफ.तारूण्याचा समुद्र दिवसागणिक खवळत होता खरंतर समुद्र खवळला तरी लाटांची मर्यादा विवेकाने रोखायला,राखायला हवी.पण गजराबाईला तारूण्य दर्या ताब्यात ठेवता आला नाही. चुका मागुन चुकांची किंमत तिला चुकवावी लागते.तिच्या कुशीत एक मानवी आकार,मानवी अंकुर रूजला. मातृत्व हमखास गजराबाईचेच होते पण पितृत्वाचे दातृत्व ती कोणाला देणार होती ? ऐन हुरड्यातलं ज्वारीचं कणीस अनेक पाखरांनी वेचलं होतं.या अनाम चोचीच्या एखाद्या घावाने वैजयंता सगुण साकारली होती.


अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय वैजयंता 2024. स्वत: भोगलेले दु:ख लेकीच्या वाट्याला येऊ द्यायचेच नाही, हा निर्धार करू न गजराबाईच वैजयंताचा माय व बाप झाली होती.आपल्या मुलीला तमाशात आणायचेच नाही ही गजराबाईची खुणगाठ होती

अण्ण भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय वैजयंता 2024


वाढत्या वयापुढे व उभरत्या नव तमाशा तारकांपुढे आता गजराबाई फिकी पडत चालली होती.पौर्णिमेच्या चंद्राचा प्रवास अमावस्येकडे ढळणीला लागला होता पण टिपुर चांदणं पिलेली गजरा आपला उतरता प्रभाव मान्य करायला तयार नव्हती.पण एके दिवशी तमाशा बारीत चंद्रा कलावंतीनीने गजराबाईचा पराभव केला.पराभव स्वीकारत गजराबाई तमाशा सोडून देते.उपजिविकेसाठी धुणीभांडी करते. वैजयंताला शालेय शिक्षण देते.पण चंद्राकडून तमाशा बारीत झालेला पराभव गजरा विसलेली नव्हती.ती विसरणारही नव्हती. वैजयंताला तिला तमाशा फडात आणायचेच नव्हते पण चंद्राचा पराभव करण्यासाठी फक्त एका खेळापुरतं वैजयंताने नाचावं.असं तिचं मन म्हणत होतं पण तयार होत नव्हतं.


अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय 2024

वैजयंता तमाशात नाचणार नव्हती पण माशाच्या पिलाला पोहण्याचे क्लास लावावे लागत नाहीत. वैजयंता अवघ्या बारा दिवसाची होती तेव्हापासून ओल्या बाळंतपणातच गजराबाईने पायी घुंगरू बांधले होते.आईचे निरिक्षण करत टवकारलेल्या नेत्रांनी ते सारं पद लालित्य वैजयंताने आपल्या उरी साठवले होते.
अण्णा भाऊंचे लेखन म्हणजे डोळस किनार व समाज वाचनाचा बारकावा‌.त्यांच्या लेखनात येणारं प्रत्येक पात्र हे त्या त्या वेळचे समाजाचे सामाजिक अपत्य आहे.


अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय 2024 वैजयंता कादंबरीत पात्रात आलेली तिची समवयस्क चंद्रा,बालमित्र व तिने मनाने तिच्या मनाशी वरलेला उमा ,बेरकी नजरेचा, देखण्या तमाशा स्त्री कलावंतांना अंगाशी खेळविणारा चंदुलाल ,चंदुलालचे पापं पोटात घेणारा त्याचा बाप बाबालाल ,खुंदलापुरचा आबा पाटील ,जोडं उचलणारा बळी,अन्याय सहन न करणारा जंगी,वैजयंतावर जीवापाड प्रेम करणारा उमा,परसूमामा ,आबा पाटलासोबत पारंपारिक वैर असलेला दत्तू सवाखंडे इत्यादी पात्रांच्या माध्यमातून अण्णा भाऊ त्या वेळचं समाज जीवन रेखाटतात.


चंदूलाल वैयक्तिक आयुष्यात सपशेल अपयशी माणुस.तमासगीर स्त्री संगापायी त्याची एक बायको मरणपंथाला टेकलेली तर दुसरी दुसरा घरोबा करण्यास राजी झालेली.तमाशा कलावंत चंद्राला राजरोस भोगूनही वैजयंताची आस काही चंदूलालच्या मनातून जात नाही. तिच्या प्राप्तीसाठी चंदुलाल जे अवलंबवितो ते प्रचंड चुकीचे,अनीतीमान आहे.
उमा हा सुद्धा एकेकाळी तमाशा गाजवलेल्या ज्योती व हौसाचा मुलगा पण उमाच्या जन्मा पूर्वीपासूनच त्यांनी तमाशा सोडलेला .त्यामुळे उमाचा पिंड तमाशापासून दूर असला तरी त्याच्या रक्तात तमाशा आहेच.


अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय वैजयंता 2024 वैजयंता ही शील व चारित्र्य विकणारी स्त्री नाही‌.ती कलेची बाजी लावणारी कलाकार आहे पण देहाची बोली लावणारांवर थुंकणारी ती चपळ वीज आहे. कलेसाठी पायात चाळ बांधणारी ती कलाकार आहे पण चाळ तोडून चाळा करणारांचे हातच छाटणारी ती वीर आहे.


वैजयंताच्या प्राप्तीसाठी चंदुलाल अनेक कटकारस्थाने रचतो.खुंदलपुरचा आबा पाटील दानशुरतेचा,नेक माणसाचा आव आणत असला तरी त्याच्या हृदयातही वैजयंतासाठी राखीव जागा आहे ‌.वैजयंताच्या प्राप्तीसाठी त्याने रचलेला डाव पुस्तकात वाचा.


अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय वैजयंता 2024

तमाशात येते का ? येते तर का येते ? चंदुलाल व आबा यांपैकी कोण वैजयंताला वश करत असेल ? उमा व वैजयंताचे प्रेम फलद्रुप झाले असेल का ? नक्की कसा असेल बरे कादंबरीचा शेवट ?


अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय वैजयंता 2024 मुळात वैजयंता ही काही रहस्यमय कादंबरी नाही पण वाचक जसा जसा पुढे सरकत जातो ,तसं काही घटना ,काही पात्र रहस्य उभं करतातच. कादंबरीचा शेवट सांगून कादंबरी न वाचलेल्या लोकांना मला आयते उत्तर द्यायचे नाही आहे.खरंतर कादंबरीचा शेवट करून मी ग्रंथ परिचय संपवू शकतो पण त्यामुळे वाचकांची उत्कंठ भावनेची सहल किनारा येण्याआधीच संपेल.त्यामुळे एकतर कादंबरीच वाचा नाहीतर याच कादंबरीवर आधारित 1961 चा वैजयंता चित्रपट पाहा.


वैजयंताची अब्रू लुटली जाईल असा एक प्रसंग वैजयंता कादंबरीत शेवटी येतो.त्या प्रसंगातलं वर्णन व प्रसंगाचा शेवट आपण कादंबरीतच वाचा.जे आयुष्यभर जपलंय ते लुटलं जाण्याची भयावहता व सर्वस्व गमावताना हरिणीचं वाघ होणं काय असतं ? हे वाचाच वैजयंतामधून


अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय 2024। वैजयंता पाहताना कुणी डोळ्यात प्राण आणून,पापणी न मिटता डोळेभरून पाहत असे .तर तिचा स्वर ऐकण्यासाठी कुणी कानात प्राण आणत असे.काय सांगावं ,हृदयात वैजयंता आली तर …. या कल्पनेनं कित्येकजण हृदयाला हात लावून खात्री करत असत.अस्मानी रंगाच्या पातळात वैजयंता पायात चाळ बांधून नाचायला उभी राही तेव्हा शिट्या,टाळ्या,उन्माद,नजरा तिची गुलामी करत असत.


वैजयंता वाचा बरं आता.

अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय वैजयंता 2024

पुस्तकाचे नाव वैजयंता
परिचयकर्ता कचरू चांभारे बीड 9421384434

kachari chambhar.com

अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय वैजयंता 2024
अण्णा भाऊ साठे पुस्तक परिचय वैजयंता ऑगस्ट 2024
Oplus_131072
अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय वैजयंता 2024
अण्णा भाऊ साठे पुस्तक परिचय वैजयंता ऑगस्ट 2024

22 thoughts on “अण्णा भाऊ साठे जयंती पुस्तक परिचय वैजयंता 2024”

  1. वैजयंता कादंबरी अगदी डोळ्यासमोर उभी राहतेय..
    मुळात ही पुस्तक परिचय संकल्पना खुपच छान आहे…👌
    अगदी चित्रपटाचा टिझर दाखवल्याप्रमाणेच काहीसं😊

    Reply
  2. सर, पुस्तक परिचय अप्रतिम! अण्णाभाऊ साठेंच्या कदंबऱ्या म्हणजे हिरे त्याला तुम्ही सुंदर परिचयातून कोंदण दिलेत आणि मूळ लेखन आणखी सुभग झाले. पुस्तकाचा गाभाच अलगद वाचकांच्या हाती दिला आहे.

    Reply
  3. खरच मित्रा , सलाम तुझे अमृत असे लेखन वाचुन भारावून जातो , तुम्ही आपल्या शब्दात मांडले पण हुबेहूब चित्र उभे राहीले , खरच छान लेखन केले , मी तुमचे लेखन वाचुन भारावून जातो , असेच लिहाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो .

    Reply
  4. खूप छान.. कचरू सर आपलं विवेचन अगदी शुध्द भाषा…इतिवृत सखल माहिती… आपणा पर्यंत पोहचलोत खूप खूप छान…आणा भाऊ साठे यांच्या जिवनातील प्रसंग… खूप छान….,👌👌🌷🌷

    Reply
  5. खूप छान.. कचरू सर आपलं विवेचन अगदी शुध्द भाषा…इतिवृत सखल माहिती… आपणा पर्यंत पोहचलोत खूप खूप छान…आणा भाऊ साठे यांच्या जिवनातील प्रसंग… खूप छान….,👌👌🌷🌷

    Reply
  6. पुस्तक वाचनाची गोडी निर्माण करणारे लेखन
    उत्तम लेखन

    Reply
  7. गुरुजी,
    अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे काय याचं उदाहरण
    द्यायचं तर एका क्षणात .. तुम्ही समोर याल🙏🏼🙏🏼🙏🏼
    पुस्तक परीक्षणाचे पण कांही नियम असतात आणि ती एक कला पण आहे असं म्हणावसं वाटतं, वाचून,ज्याच्यामुळे कांहीही करून ते पुस्तक मिळवणार आणि आधी वाचणार, हा निश्चय करतो वाचक.
    अफलातून पुस्तक परिचय. अभिनंदन गुरुजी 💐💐

    Reply

Leave a Comment