गोनीदा जयंती 8 जुलै दुर्गभ्रमणगाथा

गोनीदा जयंती 8 जुलै दुर्गभ्रमणगाथा

गोनीदा जयंती 8 जुलै दुर्गभ्रमणगाथा गोपाळ नीळकंठ दांडेकर अर्थात गोनीदा उर्फ आप्पा मराठी साहित्यातलं अनमोल नाव.आज आप्पांचा जन्मदिवस.शितू ,पडघवली ,माचीवरचा बुधा ,मोगरा फुलला अशा शतकभर अजरामर साहित्यकृतीचं जनकत्व आप्पांकडे जातं.गोनीदा जयंती दिन 8 जुलै दुर्गभ्रमणगाथा या पुस्तकाचा परिचय करून देत आहे.

गोनीदा जयंती दिन 8 जुलै दुर्गभ्रमणगाथा


लेखक गोपाल नीलकंठ दांडेकर

प्रकाशक… मॅजेस्टिक प्रकाशन मुंबई

पाने 450
प्रथमावृत्ती 1983

तसं तर आप्पाच्या दुर्गभ्रमंतीसाठी परिचय शब्द वापरणं चूकच आहे कारण माझं पाळण्यातलं खेळणं सुटलं होतं त्या वयापासून ही कादंबरी वाचकांच्या मनावर गारूड घालत आहे.आप्पांची दुर्गभ्रमंती म्हणजे स्व निर्मित इतिहास व भूगोल आहे.आप्पांनी स्वतः पन्नास वर्षे विविध दुर्गांना भेटी दिलेली आहेत.म्हणजे एखाद्याच्या देहाला जेवढं आयुष्य लाभत नाही तेवढा काळ तर त्यांनी गडावरच काढलेला आहे.रायगड ,सिंहगड ,राजगडाला तर वारंवार ,नित्यनियमाने माहेर असल्यागत आप्पांनी जाऊन येऊन केलेलं आहे.

गोनीदा जयंती दिन 8 जुलै दुर्गभ्रमणगाथा या पुस्तकात काय आहे ?

आप्पांनी ऐन उमेदीत शंभराहून अधिक कथा कादंब-या नाटके लिहिली.त्यांच्या कादंबरीवर चित्रपट निघाले.कादंबरी वाचनाचा नाविन्यपूर्ण प्रयोग राबविला.दुर्गभ्रमणगाथा ही कादंबरी आप्पांनी आपल्या कललेल्या अवस्थेत म्हणजे उतारवयात लिहिलेली आहे.ही कादंबरी म्हणजे लेकीच्या वीणा देव यांच्या आग्रहाखातर किल्ले भ्रमंतीचं अनुभव कथन आहे.


एकट्यानं ,कुटुंबासह ,मित्र परिवारासह गडकिल्ल्याच्या प्रवासाचा अनुभव म्हणजे दुर्गभ्रमणगाथा.पण आप्पांनी हा अनुभव मांडताना गडांचा इतिहास ,त्या काळातल्या चालू घडामोडी अतिशय छान मांडल्या आहेत.आज आप्पा हयात असते तर केसरी-वीणा-चौधरी या लोकांनी त्यांना गडकिल्ले ट्रॕव्हलिंगचे ब्रँड अँबॕसिडरच नेमले असते.स्वतंत्र प्रज्ञेच्या आप्पांनी ते मानलं असतं की नाही.? हे आप्पाच जाणोत.

पहिल्या दोन तीन पानांत आप्पा स्वतःचा परिचय लिहितात.वाकाटकांची राजधानी असलेलं अतिप्राचीन शहर अचलपूर जि.अमरावती हे आप्पाचं जन्मगाव.मुंबई पुणे तळेगाव अशी त्यांची कौटुंबिक भ्रमंती.स्वतःबद्दल थोडी माहिती देऊन आप्पा गडांचा गडेश्वर किल्ले रायगडावर आपल्याला घेऊन जातात.देवाचं देऊळ व देवळातली मूर्ती या दोघात श्रेष्ठ कोण ? माझ्यासारखा देवभोळा या गुंत्यातून बाहेर येऊ शकत नाही.मला ही दोघेही सारखीच श्रेष्ठ ,कळत्या वयापासून मी शिवराय व रायगड या दोघांना देवाचे देऊळ व देवळातली मूर्ती या अंगाने पाहतो.स्वतः आजपर्यंत रायगड सोळावेळेस पाहिलेला असल्यामुळे आप्पांनी दुर्गभ्रमणगाथेत लिहिलेला रायगड खूपच भारी वाटला.

गोनीदा जयंती दिन 8 जुलै दुर्गभ्रमणगाथा


कराड नगरीचं प्राचीनत्व ,हंबीरराव मोहित्याचं तळबीड ,महाराष्ट्रातील व बाहेरील किल्ल्यातील फरक ,मांडवगड ,प्रचितगड ,महेश्वर यांची माहिती सांगत सांगत आपल्याला रायगडावर घेऊन येतात.साडेचारशे पानाच्या दुर्गभ्रमणगाथेत आप्पांनी एकशे तेहेतीस पाने एकट्या रायगडासाठी खर्च केली आहेत.यावरून बेलाग रायगडावरील आप्पाचे प्रेम दिसून येते.आप्पांनी स्वतःचा पन्नासवा वाढदिवस रायगडावरच साजरा केला होता.रायगडाचा प्राचीन इतिहास ते 1818 पेशवाई पर्यायाने मराठेशाहीचा पाडाव असा इतिहास सांगितला आहे.1818 ते 1878 पर्यंत मराठा साम्राजाच्या राजधानीचा विसर पडला होता.1878 नंतर महात्मा फुले ,लोकमान्य टिळक यांनी गड बोलता केला.


गडावरील चोरवाटा,भुयारी मार्ग,बाजारपेठ,तलाव ,शिवकाळ यांची सविस्तर माहिती वाचण्यासाठी दुर्गभ्रमणगाथा वाचावं.वेगवेगळ्या ऋतूत दिसणारं गडाचं वेगळेपण व रोजचाच पण नव्याने भासणारा सूर्योदय-सूर्यास्त रायगडावरच पाहावा.असं आप्पा लिहितात.गडाच्या अनुषंगाने घडलेल्या राजकीय घडामोडी आप्पांनी मांडल्या आहेत.खूप सारं त्यांनी लिहिलं आहे.त्यांनी लिहिलेल्या त्यातल्याच दोन आठवणी मी इथं सांगतो व मग तुम्हाला पुढच्या गडावर घेऊन जातो.

गोनीदा जयंती दिन 8 जुलै दुर्गभ्रमणगाथा

सूर्यकांत मांढरे या दिग्दर्शकासोबतची आठवण आप्पांनी लिहिली आहे.एका चित्रीकरणात शिवाजी महाराजांची मूर्ती ,सिंहासन घ्यायचं होतं.अचानक त्यांना असं वाटलं की फुलांचा हार घातलेली मूर्ती चित्रीकरणात घ्यावी.मग तिथलीच फुले तोडली व हार बनवायला घेतला.हारासाठी दोरा लवकर सापडत नव्हता.तेव्हा आप्पा स्वतःच्या गळ्यातील जाणवे तोडतात व त्या दो-यात फुले ओवतात.जाणवं देताना आप्प म्हणतात ज्यानं जाणवं जिवंत ठेवलं ,त्यांच्यासाठी जाणवं वापरता आलं हे सुख खूप मोठं आहे.आप्पाची दुसरी आठवण म्हणजे शीवतीर्थ रायगड या ग्रंथाचे प्रकाशन.केंद्रीयमंत्री तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते होणारे प्रकाशन ऐनवेळी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाच्या पूर्वसंधेला तब्बल दोन तासाचा वेळ देऊन नाईकसाहेबांनी आप्पाच्या तोंडून शिवगाथा ऐकली.

1974 सालचा तीनशेवा राज्याभिषेक दिन व 1980 चा शिवरायांचा तीनशेवा स्मृतिदिन सोहळा आप्पांनी या देही या डोळी मनभरून पाहिला.हे वर्णन वाचत असताना सहज माझ्या मनात आलं ,या सोहळ्यांचा चारशेवा स्मृतिदिन 2074 साली होईल.त्यावेळी मी असेल की नसेल हे सांगता येत नाही.माझी जन्मतारीख जून 1979 असल्यामुळे मी नसण्याचीच शक्यता अधिक आहे पण असलो तरी मी पंचाण्णव वर्षाचा असेल म्हणजे गड चढण्यासाठी संपूर्णतः अपात्र.पण मी पडल्या जागी टीव्हीवर तो सोहळा पाहीनच.

गोनीदा जयंती दिन 8 जुलै दुर्गभ्रमणगाथा

राजगड

रायगडावरच पाय व मन रेंगाळत असताना आप्पा आपल्याला राजगडावर घेऊन जातात.स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड.धाकले छत्रपती रामराजेंचा जन्म व थोरल्या राणीसाहेब सईबाईंचा मृत्यू ही गडावरील ठळक स्मृती.आग्र्याला जाताना माँसाहेबांचा राजांनी इथूनच निरोप घेतला होता.पाठमो-या राजांना मृत्यूच्या दाढेत जाताना पाहून आईचे अश्रू ओघळून जिथं मुरले ती माती म्हणजे राजगडाची माती.

माचीवरचा बुधा कादंबरी व चित्रपट निर्मिती याच गडावरची.संजीवनी माची,सुवेळा माची,पद्मावती माची यांची वर्णनं,गडावरील फुलझाडांचे सौंदर्य वाचण्यासाठी मूळ ग्रंथच वाचावा.वेगवेगळ्या वाटांनी केलेली गड भ्रमंती व थरार अनुभव मूळ पुस्तकातच भेटतील.


स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवरील घडामोडी मांडण्यासाठी आप्पांनी रायगडाखालोखाल इथं एकशे दोन पानं खर्च केली आहेत.

रायगड-राजगड फिरून झाल्यावर आप्पा आपल्याला प्रचंडगड- तोरणा-हरिश्चंद्रगड असं फिरवून आणतात.दक्षिणेला भीमा व उत्तरेला गोदा या दोघींच्या मध्यभागी हरिश्चंद्र उभा.मुळा प्रवरेला अंगावरून खेळवत सोडणारा हरिश्चंद्र तारामती व बाळ रोहिदास अशा तीन उंच शिखरांसह उभा आहे.आप्पांनी चारवेळेस पाहिला.चांगदेव वटेश्वराचं वास्तव्य म्हणजे हरिश्चंद्र गड . ईथून जवळच आहेत शिरपुंजे भैरवगड,अलंग मदन कुरंग,रतनगड .

हरिश्चंद्रगडावरून मग आपण खंडाळा लोणावळा परिसरातील लोहगड विसापूर या दुर्गम किल्ल्यांकडे जातो.चालुक्य,राष्ट्रकुट ,सातवहन अशा प्राचीन राजवटींची साक्ष देणारे हे किल्ले वनराईने समृद्ध आहेत.

गोनीदा जयंती दिन 8 जुलै दुर्गभ्रमणगाथा

पन्हाळा-विशाळगड

शिवरायांचे पन्हाळ्यात अडकणे व स्वामीनिष्ठ बाजीप्रभू देशपांडेचे बलिदान ,शंभुरायांसोबतचा दगाफटका अशा घटनांचा साक्षीदार म्हणजे पन्हाळा-विशाळगड.

इथून मग आपण येतो प्रतापगडावर.घनदाट जंगल व निबीड अरण्याने वेढलेला प्रतापगड.स्वराज्य बाळसं धरत असतानाच त्याचा घास गिळू पाहणा-या अफजलखानाचा खात्मा झालेला प्रसंग म्हणजे प्रतापगड.

सिंहगड

गड आला पण सिंह गेला हे वाक्य आम्ही दुध म्हणून पिलो आहोत.व त्या दुधावरच वाढलो आहोत.या गडाला तीन हजार वर्षाचा इतिहास आहे.सातवहन ,चालुक्य,राष्ट्रकुट ,विजयनगरचे राजे,म.तुघलक,मलिक अहमद,शहाजीराजे,निजामशाही,आदिलशाही,शिवशाही,मोगलाई ,इंग्रज अशा अनेक सत्ताधीशांनी सिंहगडावर राज्य केले.स्वतः औरंगजेबाने तख्तेरवा पालखीतून स्वतः फिरून पाहिलेला किल्ला.
तानाजी व सिंहगड याच नात्याचं आमच्या मनावर गारूड आहे.

सिंहगडाच्या आठवणी सांगून आप्पा आपल्याला शिवनेरीवर घेऊन जातात.महाप्रतापी ,युगप्रवर्तक ,रयतेचा राजा राजे शिव छत्रपती यांचे जन्म ठिकाण म्हणजे शिवनेरी.

गोनीदा जयंती दिन 8 जुलै दुर्गभ्रमणगाथा असंच मग आपण पुरंदर ,कर्नाळा,सिद्धगड,श्रीपादचिन्ह जलदुर्ग,रसाळ ,सुमारगड,महिपतगड करून जिंजीला जातो.

गडावरचा प्रवास करताना तिथली पाणी व्यवस्था,सुरक्षा व्यवस्था वाचताना आपण आचंबित होऊन जातो.

गोनीदा जयंती दिन 8 जुलै
गोनीदा जयंती दिन 8 जुलै दुर्गभ्रमणगाथा

आज आप्पा हयात नाहीत पण त्यांनी दिलेली दुर्गभ्रमंतीची नजर सोबत आहे.आप्पा म्हणतात कोणताही गड प्रत्येक भेटीवेळी काहीतरी नवं देतो पण आपल्याजवळ ती शोधक नजर हवी.

गड किल्ल्यांना भेटताना मला आप्पा नेहमी भेटतात. दुर्गभ्रमणगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने वैयक्तिक माझे एक दोन प्रश्न अनुत्तरीत आहेत ;आप्पा नसल्यामुळे मी ते कधी कोणाला विचारणार नाही.

गोनीदा जयंती दिन 8 जुलै दुर्गभ्रमणगाथा जयंती दिनी गोनीदा उर्फ आप्पांना विनम्र अभिवादन.

शब्दांकन….

कचरू चांभारे
मुख्याध्यापक
जि.प.प्रा.शाळा मन्यारवाडी ता.जि.बीड
9421384434
chambhareks79@gmail.com

6 thoughts on “गोनीदा जयंती 8 जुलै दुर्गभ्रमणगाथा”

  1. आप्पांना जयंती दिनानिमित्ते अभिवादन .. !!

    गो.नि. दा. आणि बाबासाहेब पुरंदरे ही दोन व्यक्तिमत्वे, म्हणजे महाराष्ट्राला पडलेली गोड स्वप्ने, दैवते भले याबाबत देखील आपल्यात राजकारण वगैरे केले जाते, परंतु अस्सल मराठी मातीतील माणसाला, शिव प्रेमीला, असे भेद भाव कधीच नाही करता आले त्यामुळे मला ही दोन असामान्य व्यक्तिमत्वे कायमच भूल पाडतात, संमोहित करतात, यांच्या अचाट कर्तृत्वाने भारावून जायला होते, निशब्द होते .. !!

    गो नि दांचे दुर्गभ्रमण गाथा पुस्तकाचे आपण नेहमी प्रमाणेच आपल्या अगाध ज्ञानाने, हुशारीने जे काय रसग्रहण केले आहे त्यामुळे संपूर्ण ४५०-५०० पुस्तकांची अगदी या आपल्या छोट्याश्या लेखात देखील थोडक्यात व्यवस्थित कल्पना येते, याकरिता खूप धन्यवाद..

    प्रविण दुधाने…

    Reply
  2. गोनिदांचे च दुर्गभ्रमणगाथा या पुस्तकावरील लेख वाचून आम्ही मात्र गडकोटांचे च भ्रमण केले.
    खूप छान लेख.

    Reply

Leave a Comment