जागतिक दहशतवाद विरोधी दिन 21 मे 2024 (Anti terrorism day 2024)

जागतिक दहशतवाद विरोधी दिन 21 मे 2024 (anti terrorism day 2024)

जागतिक दहशतवाद विरोधी दिन जागतिक पातळीवर 21 मे रोजी साजरा करण्यात येतो.

 21 मे हा दिवस दहशतवाद विरोध दिन म्हणून साजरा करण्यात येतो.गल्ली ते दिल्ली व दिल्ली ते संपूर्ण जग अशी दहशतवादाची व्याप्ती आहे.जगाने अनेकवेळा दहशतवादाचा वणवा भोगलेला आहे.आपला भारत व इराक,इराण ,सौदी अरब,अफगाणिस्तान या देशांनी दहशतवादाची खूप मोठी किंमत चुकवलेली आहे.इंग्लंड ,फ्रान्स ,जर्मनी ,अमेरिका अशा दादा देशांनाही दहशतवादाचा फटका बसलेला आहे. 21 मे  1991 रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची लिट्टे बंडखोरांकडून हत्या झालेली आहे.त्यामुळे 21 मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो.दहशतवादास विरोध व सजग नागरिकाची जबाबदारी जाणीव या उद्देशासाठी हा दिवस साजरा केला जातो.
Terrorism concept. Terrorist attack on peaceful human

जागतिक दहशतवाद विरोधी दिन 21 मे 2024

जनमानसाची जागृती करतो.

दहशतवादामुळे इतर कोणत्याही देशापेक्षा भारताची जीवीत व वित्तीय हानी जास्तच झालेली आहे.वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील 2011 च्या हल्ल्याने दहशतवादाचं अनैतिक पितृत्व असलेली अमेरिका पहिल्यांदा हादरली .दहशतवादाकडे जागतिक समस्या म्हणून पाहण्याची बुद्धी अमेरिकेला तेथूनच सूचली.त्यांच्याकडे पुन्हा अशी दुर्घटना घडली नाही हे त्या देशाचे सुदैवच.आपल्याकडे नियमित कालखंडानंतर वैश्विक सत्य असल्याप्रमाणे दहशतवादी घटना घडल्या आहेत.पुन्हा पुन्हा घडत आहेत.पुलावामा हल्ला,छत्तीसगड राज्यातील हल्ले हे अलिकडील काळातील उदाहरणे आहेत.


जागतिक दहशतवाद विरोधी दिन 21 मे 2024 सजगता वाढवितो.

गल्लीतली छोटी बोळ ते दिल्लीतले संसदभवन दहशतवादाचे बळी ठरलेले आहे.मुंबई ,बंगरूळू ,हैद्राबाद ,जयपूर अशा राजधानीच्या शहरासह पुणे ,नागपूर ,मालेगाव,नांदेड इत्यादी निम शहरेही दहशतवादाने हादरलेली आहेत.मंदीर ,मश्जिद ,चर्च ,अशा श्रद्धेय ठिकाणी तसेच बेकरी, शाळा ,हॉटेल ,रेल्वे स्टेशन अशा सार्वजनिक ठिकाणीही दहशतवादी हल्ले झालेले आहेत.जमिनीवर ,समुद्रात व 1999 चे विमान अपहरण असा दहशतवादाचा जलचर ,भूचर ,अवकाश प्रवास झालेला आहे.


जागतिक दहशतवाद विरोधी दिन 21 मे 2024 जबाबदार नागरिक घडवितो.

दहशतवाद म्हटलं की आपण फक्त एखाद्या अतिरेकी गटाने अमुक अमुक ठिकाणी केलेला बॉम्ब हल्ला किंवा केलेला बेछूट गोळीबार एवढ्याच गोष्टी लक्षात घेतो.खरं तर या घटना म्हणजे दहशतवाद आकारास आणणाऱ्या संघटनांचे टोकाचे दृश्य स्वरुप आहे.दहशतवादाची मुळे खूप खोलवर गेलेली असतात व दहशतवाद सर्वव्यापी असतो.गोळीबाराच्या दहशतवादासोबतच राजकीय दहशतवाद ,आर्थिक दहशतवाद ,धार्मिक दहशतवाद ,सत्तेचा दहशतवाद ,जातीयतेचा दहशतवाद, या दहशतवादाचेही उपद्रवमूल्य समजावून घेणे आवश्यक आहे.


जागतिक दहशतवाद विरोधी दिन 21 मे 2024

दहशतवादाचा अर्थ — वैयक्तिक व सामुहिक राज्य संकल्पना अंमलात आणण्यासाठी शांततामय समाजजीवन व लोकसंमत शासन व्यवस्था अराजकतेकडे नेण्यासाठी एखाद्या गटाकडून वारंवार करण्यात येणारी हिंसक कार्यवाही होय. जॉन क्रेटम यांच्या मते आपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करुन घेण्यासाठी विशिष्ट समुहात आत्यंतिक भीती निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यांनी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालविलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय.दहशतवादाचे स्वरुप हे राजकीय ,धार्मिक ,सामाजिक वा सांस्कृतिक हेतूने प्रेरित असते.मानवी हक्क व सर्वसंमत लोकशाही तत्वांना दहशतवाद गणतीत धरतच नाही.चर्चा व संवाद यापेक्षा त्यांना शस्त्रांची व रक्त सड्यात पडलेल्या जीवांनी आकांताने दिलेली आरोळीच जास्त आवडते.मुंबई बॉम्ब स्फोट ,संसद भवन ,कसाब हल्ला ,जर्मन बेकरी पुणे ,रेल्वे स्टेशन साखळी स्फोट अशा जनजीवन विस्कटून टाकणाऱ्या अमानवी कृत्याला जन्म देणे हे कोणत्याही दहशतवादी संघटनेचे मूल कर्म आहे.


जागतिक दहशतवाद विरोधी दिन 21 मे 2024दहशतवादी हल्ल्यात गेलेले शेकडो बळी व अशा हल्ल्यांचा निषेध म्हणून पुकारलेल्या बंद मोर्च्याने घेतलेले बळी वेगळेच.शांततामय जीवन जगणं ही प्रत्येक मानवाची प्राथमिक गरज आहे.व त्याला तसं जीवनमान जगण्यासाठीची व्यवस्था व वातावरण निर्मिती करणं हे त्या त्या शासन व्यवस्थेचे काम आहे.


दहशतवादाचं सार्वत्रीकीकरण पाहता असं खेदानं म्हणावं वाटतं जगातली कोणतीच राजकीय सत्ताधारी व्यवस्था आपल्या प्रजेला दहशतवादापासून मुक्त ठेऊ शकलेली नाही.


जागतिक दहशतवाद विरोधी दिन 21 मे 2024 जगातील दहशतवादी संघटनांची नोंद घेतो.

अल कायदा ,लिट्टे ,तालिबान ,इसिस ,बब्बर खालसा ,पिपल्स वॉर ग्रुप अशा कितीतरी दहशतवादी संघटना कार्यरत आहेत.त्यांची एक समांतर कार्यकारिणीच असते.आधुनिक शस्त्रे व आधुनिक प्रगत तंत्रे वापरुन समाज जीवन विस्कळीत करून देशातील शासन व्यवस्था जेरीला आणणे हे त्यांचे मुख्य काम असते.दहशतवाद्याने झाडलेल्या गोळीला जात ,पात ,धर्म नसतो.त्यांच्या गोळीचे लक्ष्यही जात पात धर्म नसतो.लक्ष्य फक्त एकच ते म्हणजे अराजक पोषक वातावरण निर्मिती.गुन्हेगारांच्या जातीवरुन त्यांच्या जातीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारी बौद्धिक व्यवस्था जन्माला आली व त्यामुळे जातीय सलोख्याला भेगा पडल्या व मानवतेच्या बंधुभावाच्या भिंती ढासळल्या.


जागतिक दहशतवाद विरोधी दिन 21 मे 2024.

दहशतवादाची कारणे —


वाढती लोकसंख्या ,बेकारी ,दारिद्रय ,असुरक्षितेची भावना ,सुसंवादाचा अभाव ,स्पर्धात्मक भावना ,संकुचित विचार ,लोभ -लुटारु वृत्ती,अंमली पदार्थांचा व्यापार ,आर्थिक विषमता ,रोजगार निर्मितीचा अभाव ,प्रस्थापिताकडून अन्याय झाल्याची भावना यांसह अनेक कारणांमुळे दहशतवाद रोज वाढतो आहे.सरकारकडून अपेक्षाभंग व परिस्थिती हाताळण्याचे सरकारी अपयश हे ही दहशतवादाचे सबळ कारण आहे.

दहशतवादाचे दुष्परिणाम 

जनजीवन विस्कळीत होते.
संरक्षणावरील शासकीय खर्च बेसुमार वाढतो.
लोकशाही मूल्यांचा ऱ्हास होतो.
सार्वजनिक संपत्तीचे अतोनात नुकसान होते.
ज्या कुटुंबातील व्यक्तीचा अकस्मात बळी जातो त्या कुटुंबाची हानी कधीच भरून येत नाही. सामुहिक सलोखा नष्ट होतो व विकासाचा मार्ग थांबतो.


दहशतवाद रोखण्याचे उपाय


आपला भारत देश लोकसंख्येने अब्जाधीश आहे.वेगवेगळे धर्म ,जाती ,परंपरा ,विविध प्रांत ,भिन्न भिन्न बोलीभाषा यामुळे आपल्या देशाला फार सावध राहावे लागते.साध्या साध्याही गोष्टीही इथे लोकांच्या जीवावर उठतात.मांस भक्षण किंवा सडक्या आंब्याचे कारणही इथं इहलोकातून परलोकात घेऊन जातं.

जागतिक दहशतवाद विरोधी दिन 21 मे 2024
दहशतवाद रोखण्यासाठी पुढील उपाय राबवावेत

  1. समोरासमोरची लढाई टाळण्यासाठी काही गटांकडून किंवा देशाकडून दहशतवादाचा अवलंब केला जातो.हे सर्वांनी कायम लक्षात ठेवावे.
    2 दहशतवादविरोधी कायदे कडक असावेत व त्याची अंमलबजावणीही तशीच निरपेक्षपणे व्हावी.
    3 दहशतवाद हा विषय शाळा स्तरावर सर्वच इयत्तांसाठी समकेंद्री मांडणीत चढत्या क्रमाने असावा.
    4 सापडलेली वस्तू उचलण्यासाठी असते .ही सार्वजनिक सत्य भावना आवरावी
  2. 5जाती जाती धर्म भाव आदरयुक्त असावेत.
    6 मानवता धर्मावर प्रगाढ श्रद्धा असावी.
    7 शासन व जनता यांनी एकत्र प्रयत्न करावेत.
  3. 8. दहशतवादाचे बळी पडलेल्या लोकांसाठी रेड क्रॉस सैनिक बनून मदत करावी.
    शांततामय मार्गाचे जीवन प्रत्येकालाच प्रिय असते अन् दहशतवादाला अशांतता प्रिय असते.दहशतवादी वातावरणात वैयक्तिक ,कौटुंबिक ,सामाजिक व सामुहिक प्रगतीच्या वाटा खुंटतात.लोकशाही मार्गानेच मोठ्यात मोठ्या जनसमुहाचे कल्याण साधता येते.आपल्या सर्वांच्या हितासाठी दहशातविरोधी दिनी शपथ घेऊन शासकीय सोपस्कर पार पाडण्यापेक्षा मी स्वतः कोणत्याच दहशतवादी मार्गावरुन जाणार नाही व माझ्या जवळच्या कोणासही दहशतवादी कृती करु देणार नाही.अशी कृतीशील शपथ घेऊन वावरणं आवश्यक आहे तरच आपण दहशतवादमुक्त भारताचं स्वप्न पाहू शकतो.एकमेकांना निपटण्याची भाषा हे दहशतवादाचं छोटं रोपटंच असतं.लोकशाही मूल्याला ते ही घातकच.
    दहशतवाद रोखण्यासाठी बलिदान दिलेल्या पोलीस व लष्करी सैनिकांना ,अधिका-यांना ,राजकीय नेत्यांना ,पत्रकारांना भावपूर्ण श्रदांजली अर्पण करतो.

  4. कचरू चांभारे
    मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा मन्यारवाडी ता.जि.बीड
    संपर्क 9421384434
    kacharuchambhare@gmail.com

12 thoughts on “जागतिक दहशतवाद विरोधी दिन 21 मे 2024 (Anti terrorism day 2024)”

  1. दहशतवाद रोखण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न करने आवश्यकच आहे , पण आपल्या देशात राजकीय लोकच याला बढावा देतात हे जर बंद झाले तर मी सांगतो की 50% दहशतवाद खत्म झालेम्हणुन समजा .

    Reply
  2. सखोल अभ्यास करून लेख लिहिला आहे.
    केंद्र व राज्य सरकार यांना हा लेख पाठवावा,
    ही विनंती.

    Reply

Leave a Comment