पुस्तक परिचय कोहजाद 2025

बलुचींचे मराठा क्षत्रियत्व कोहजाद
माझा तरूण लेखक मित्र अभिषेक कुंभार यांचे कोहजाद वाचून नुकतेच पूर्ण केले. लेखकाने पुस्तक पाठवून बरेच दिवस झाले होते पण इतर ग्रंथ वाचन करताना कोहजाद जरा मागेच पडले होते.वाचून झाल्यावर ग्रंथ समिक्षाही विलंबात ग्रासली गेली होती.विलंब ग्रस्ततेचा बंध आज तुटत आहे.
प्रकाश कोयाडे,सुशांत उदावंत,केतन पुरी,शरद तांदळे, सिद्धार्थ शेलार,नितीन थोरात,प्रेम धांडे, अभिषेक कुंभार ही माझी आवडती लेखक मित्रमंडळी नेहमीच्या लेखक पठडीतली नाहीत. छोट्याशा धाग्याला धरून ,वाचकाला खिळवून ठेवत काहीतरी नवं ,आगळं देण्याचा या मंडळींचा प्रयत्न आहे.त्यांनी लिहिलेल्या आतापर्यंतच्या ग्रंथावरून तरी हे स्पष्ट सूचित झाले आहे.
पुस्तक परिचय कोहजाद 2025 बलुची मराठा क्षात्रतेज कोहजाद
पुस्तक परिचय कोहजाद 2025
कोहजाद हा ग्रंथ एकूण 496 पानांचा आहे. अभिषेक कुंभार लिखित तीनही पुस्तकांची नावे वेगळीच असल्यामुळे ती वाचकाला शीर्षकाचा विचार करायला भाग पाडतात.एकदा का शीर्षक डोक्यात घोळले की ग्रंथ हाती घ्यायचाच याची मनाशी खुणगाठ होतेच.अभिषेकचे काहून मी यापूर्वीच वाचलेले होते अन् तेव्हाच लेखकाकडून आगामी कोहजाद ग्रंथाचे सुतोवाच मिळाले होते.
ग्रंथाबद्दल लिहिण्यापूर्वी मला अभिषेकचे खूप खूप कौतुक करायचे आहे.या कौतुकाचा मला गर्व आहे. काहून,कोहजाद,फिरस्ते ही तीन पुस्तके अभिषेकने लिहिली आहेत.
पुस्तक परिचय कोहजाद 2025

कोहजाद या शब्दाचा अर्थ होतो डोंगराचा,पर्वताचा पुत्र.कोहजाद हा युवक हा या पुस्तकाचा नायक आहे.पण कोहजादचे कथानक घडले तो भाग पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील आहे.कोहजादमधील काही पात्र व घटना काल्पनिक आहेत ,पण बरीचशी पात्र व घटना सत्यही आहेत.त्यामुळे काल्पनिक पात्र व काल्पिक घटना सुद्धा सत्य बनून वाचकांच्या मनात घर करतात.
कोहजादचं कथानक बलुचिस्तानचं असलं तरी पाकिस्तान, पाकव्याप्त काश्मीर,भारत, अफगाणिस्तान, अमेरिका,रशिया,चीन अशा आंतरराष्ट्रीय घटकांसोबत आपण फिरून येतो.पण ही भ्रमंती कुठल्याही प्रकारची नैसर्गिक, भौगोलिक सहल नसून तो वैचारिक, बौद्धिक भीतीमिश्रीत फेरफटका आहे.
कोहजाद व त्याचा परिवार, संपूर्ण बलुच आज मुस्लीम असला तरी एकेकाळचा तो महाराष्ट्रीयन मराठा आहे.महाराष्ट्रीयन मराठा म्हणजे केवळ एकटा मराठा जात समुह नसून संपूर्ण महाराष्ट्र जाती समुह सूचित करतो.पाकिस्तान हे लोकशाही राष्ट्र असलं तरी पाकिस्तानची ओळख धुमसतं राष्ट्र अशीच आहे.पाकच्या सीमा व अंतर्गत भागही सातत्याने चकमक पाहतो आहे.
पुस्तक परिचय कोहजाद 2025 बलुची मराठा क्षत्रियत्व कोहजाद
पानिपतचा रणसंग्राम ही भारतभूमीतील भयानक लढाई आहे.प्रचंड जीवित हानी झालेला हा रणसंग्राम आहे.पानिपत संग्रामानंतर उडालेल्या गदारोळानंतर वाट फुटेल तिकडे धावलेले मराठा सैन्य व अब्दालीने कैद करून नेलेले सैन्य बलुचमध्ये स्थायिक झाले.ते मुसलमान झाले पण मराठी रिवाज त्यांच्या मनातून कधीच गेले नाहीत.आजही ते बुग्ती मराठा,शाहू मराठा अशा नावांनी ओळखले जातात.बलुच हा भौगोलिक नात्याने पाकिस्तानचाच प्रांत असला तरी जैविक न्यायाने बलुचि व इतर पाकिस्तानी यांचे जैविक,भावनिक मनोमिलन झाले आहे,असे वाटत नाही.सतत संघर्ष तिथं आहे.हा संघर्ष फक्त शारीरिक कष्टाचा असता तर बात वेगळी होती पण हा संघर्ष रक्तरंजित संघर्ष आहे.या रक्ताच्या धारेला अनिश्चितता आहे. बाराखडी शिकताना इथं ब बदकाचा नसतोच.बदकाचं सफेद नाजुकपण इथं नाहीच आहे.इथल्या बाराखडीतला ब हा बंदुक व बॉम्बलाच ध्वनित करतो.
पुस्तक परिचय कोहजाद 2025 बलुची मराठा क्षात्रतेज कोहजाद
कोहजाद पाकिस्तानी विद्यापीठात शिकलेला तरूण आहे.त्याचे अब्बू,मोठा भाऊ फवाद,खानबाबा बलुचि हक्कासाठी लढत असतात.खरं तर आधी कोहजाद या चळवळीपासून दूर असतो पण रक्तरंजित चळवळ इथल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.त्यामुळे ऐन तारूण्यात कोहजाद या चळवळीत येतोच.भाऊ फवाद हा बलुच चळवळीचा मुख्य म्होरक्या आहे.
फवादच्या मृत्यूनंतर कोहजाद ही परंपरा पुढे चालवितो.बलुच चळवळीचा आधारवड खानबाबा संपल्यानंतर ही चळवळ थांबेल असं पाक सरकारला व दहशतवादाच्या हितसंबंधात हित गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटतं पण कोहजाद असं काही पेटून उठतो की पाक सरकार त्याच्यामागे हात धुवून लागते.कोहजादने घडवून आणलेल्या चकमकी,शह वाचताना वाचक खिळून राहतो.
पुस्तक परिचय कोहजाद 2025
घटनाक्रम वाचत असताना काही प्रसंग रहस्यमय आहेत.असं असं घडू शकेल अशी शक्यता वाचकाच्या मनात येते पण हे पुस्तक मात्र मनात निर्माण झालेल्या कल्पनेला बेमालूम कलाटणी देते.हे लेखकाचे कसब एकदम कौतुकास्पद आहे.
पुस्तक परिचय कोहजाद 2025
कोहजादचा बलुचिस्तान सोडून पाकच्या मुख्य भूमीत जाण्याचा प्रवास म्हणजे एक थरार चित्रपटाचे कथानक आहे.तो थरार वाचत असताना पाकमधील शहरे,गल्लीबोळी,हमरस्ते आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात.प्रसंग व स्थळांच्या वास्तविक वर्णनात कल्पनेने नेणे.यात लेखकाला कमालीचे यश लाभले आहे.हा सारा प्रवास मला वाटतं मुळ ग्रंथातच वाचावा व पाकिस्तानची सहल करावी.
कोहजाद म्हणजे कोहजादने बलुचि समुदायाची खदखद एका पाकिस्तानी सुज्ञ पत्रकारास सांगितलेली आपबीती आहे.शेजारच्या देशात व शेजारील त्या देशातील एका प्रांताची ती कथा आहे.पण बलुचिचे नाते पानिपत लढाईपासून मराठी मातीशी असल्यामुळे ती आपलीच कथा आहे असं वाटते.पुस्तक बंद करून बलुचिस्तानला एक चक्कर मारावी वाटते.
नवनवीन शब्द उदा.बलुचि कावा,कोश्नीकोव्ह ,दहशतवादी भाषा या ग्रंथात वाचायला मिळते.
लाहोर,पेशावर,सुई,डेराबुग्ती इत्यादी शहरांशी संबंधित प्रसंग वाचताना एका झापडबंद देशाची सहल घर बसल्या घडून येते.
एकदा आवर्जून वाचावा असा हा ग्रंथ.

पुस्तकाचे नाव कोहजाद
लेखक अभिषेक कुंभार
Mob +918378989255
पाने 496
प्रकाशन न्यू ईरा पब्लिकेशन पुणे
मूल्य 450 ₹

पुस्तक परिचयकर्ता
कचरू चांभारे बीड 9421384434
Very nice ❤ 👍
पुस्तक परिचयावरुनच पुस्तक वाचावे अशी मनी भावना निर्माण झाली आहे.
Thank you so much
सुपर से भी उपर
Thank you so much
छान सर चांगली माहीती आहे.
खूप छान लेखन…
उत्तम पुस्तक समीक्षा….
Thank you so much
नेमकेपणाने करून दिलेल्या परिचय
धन्यवाद दादासाहेब