मी खड्डा बोलतोय 2024

मी खड्डा बोलतोय 2024

मी खड्डा बोलतोय 2024

मी खड्डा बोलतोय 2024. गोष्ट आहे रविवारची.गावाकडून परत येताना रस्त्यालगत असलेल्या एका झाडाखाली थोडावेळ विसावा म्हणून थांबलो होतो.थंडगार सावलीने मला बसल्याजागी आडवं होण्याचं सूचविलं की मी मनानेच आडवा झालो ? हे माहीत नाही पण तात्काळ धरणीआईस मी समांतर झालो होतो.माझं लक्ष नाही ,हे लक्षात येताच वरची पापणी अगदी अलगद खालच्या पापणीवर स्थिरावली.पण काही क्षणातच जोराचा आवाज आला अन् मी खडबडून जागा झालो.एका दुचाकीवरून एक चौकोनी कुटुंब नवरा बायको व दोन लेकरं घसरून पडले होते. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्डयातून दुचाकी उसळली होती व हा अपघात झाला होता.सुदैवाने कोणासही गंभीर ईजा झाली नव्हती. एक दोनदा खड्डयाकडे पाहत,खरचटलेल्या व्रणाकडे पाहत अंगावरील धुळ झटकून फारसं लागलं नाही हे समाधान घेऊन ते कुटुंब पुढे मार्गस्थ झाले.


. दुचाकी कशी उसळली असेल ? म्हणून मी सहज खड्डयाकडे पाहिले अन् काय आश्चर्य , अपराधीपणाचा थोडाही लवलेश चेहऱ्यावर दिसू न देता, खड्डाच माझ्याशी बोलू लागला .

 अन् खड्डा माझ्याशी बोलू लागला....... 

मी खड्डा बोलतोय 2024

समस्त मानव जातीच्या मला हे लक्षात आणून द्यायचे आहे की,

खड्डा व सृष्टी ,खड्डा व माणुस यांचे नाते फार पुरातन,अति प्राचीन अगदी पृथ्वीच्या जन्मापासूनचे आहे.अब्जावधी वर्षापूर्वी पृथ्वी एक तप्त गोळा होती.ती हळूहळू थंड होत गेली.सलग लाखो वर्ष पावसाचा वर्षाव झाला ,महाकाय खड्डयात पाणी भरू लागले व महासागर तयार झाले.पाणी,हवा व जमीन हे तीन घटक पृथ्वीवर जीवन निर्माणाचे मुळ स्त्रोत आहेत.झुकलेल्या आसामुळे पृथ्वीवर उतार आहे ,उतार आहे म्हणून खड्डा आहे, खड्डा आहे म्हणून महासागर आहे, महासागर आहे म्हणून जीवन आहे. असा मी तुमचा मुळचा साथीदार आहे.


मी खड्डा बोलतोय 2024 .जंगलात मिळेल ते खात भटकंती करणारा मानव ,स्थिर शेती करू लागला मग त्याला तिथेच जवळपास निवाऱ्याची गरज निर्माण झाली.लाकुडफाटा,गवताचा आधार घेत माणसांनी घरे बांधली.या घरासाठी आधार रोवताना खड्डा खोदावाच लागतो.पुढे सिमेंटची घरे आली,गगनचुंबी इमारती झाल्या पण या सर्वांचा पाया खड्डाच असतो.सिंचनासाठी तलाव बांधले.तलाव म्हणजे सुध्दा खड्डाच.शेतातली विहीर हा सुद्धा नियोजित खड्डाच आहे.प्रारंभीच्या काळात माणुस गुहेत राहायचा ,ती गुहा म्हणजे पृथ्वीवरील डोंगराच्या पोटातील खड्डाच आहे ना.
मानवजात आयुष्यभर ज्या पोटाची खळगी भरण्यासाठी आटापिटा करते ,ते पोट सुद्धा एक खड्डाच आहे. गालावर पडलेली खळी सौंदर्य खुलविते तर भीतीने पोटात आलेला गोळा काळजात खड्डा करते.दोन्हीही खड्डेच प्रचंड विरोधाभासी. अन्न शिजवायचे पात्र,जेवायचे पात्र,पाणी पिण्याचे पात्र हे सर्व खड्डेच आहेत.न पचलेलं अन्न जिरविण्यासाठी पुन्हा शोष खड्डा आहेच.

एवढंच कशाला पण ऐकून तुम्हाला गंमत वाटेल अशी एक गोष्ट सांगतो.ती गंमत म्हणजे उत्तर प्रदेशात खड्डा नावाचे एक मोठे शहर आहे. तिथं बाजारपेठ आहे,साखर कारखाना आहे, रेल्वे स्टेशनही आहे.कुशीनगरला जाताना खड्डा स्टेशन तुमचं स्वागत करते.

मी खड्डा बोलतोय 2024

खड्डा व माणुस खरं तर एकमेकांपासून वेगळे नाहीतच .पण आज माझ्या बोलण्याचा विषय खूप वेगळा आहे.
रस्ते अपघातांमुळे
समस्त खड्डे जमात हकनाक बदनाम झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे अपघात घडतात. हे मान्य, पण रस्त्यात खड्डे कसे काय पडतात ? याच्यावर तुम्ही माणसं विचार करा ना. आम्हालाही वेदना आहे,आमच्याही मनात खदखद आहे. आमच्याही मनात आक्रोश आहे.


मी खड्डा बोलतोय 2024

रस्ते अपघातात सरासरी तासाला एकोणवीस लोक मृत्युमुखी पडत आहेत.या भयावह दुर्दैवी घटनेत 18 ते 45 चा तरूण व घरातील कर्ता वयोगट बळी जाण्याचे प्रमाण 66% आहे.दुचाकीचे अपघात प्रमाण 44 %आहे.साथीच्या आजारात वा युद्धभूमीवर मरणाऱ्या लोकांपेक्षा अपघातात मरणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. अपघातास खड्डा हे कारण असले तरी वेग मर्यादा न पाळल्यामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण 71 % आहे. वेगमर्यादा हे अपघाताचे प्रमुख कारण आहे .असं सांगून मी काही माझ्यावरील आरोप दुसऱ्यावर ढकलणार नाही.दुसऱ्यावर ढकलणे हा गुण तुम्हा माणसांचा,आम्हा खड्डयांचा नव्हे. किंवा आरोप नाकारत ,मी तसं बोललोच नव्हतो असं म्हणायला मी काही नेता ,राजकीय पुढारी नाही. सर्व घटना मी टक्केवारीत सांगितल्या कारण एकतर माणसाला टक्केवारीची भाषा लवकर समजते व दुसरं म्हणजे या टक्केवारी कमि(शेण ) खाण्यातूनच आमचा जन्म आहे.
मातृत्वाचे वरदान स्त्री जातीला असले तरी फलनिष्पतीस पुरूषही कारण असतोच.तसंच रस्त्यात खड्डे निर्माण होण्यास ऊन,वारा,पाऊस जबाबदार असले तरी खरा गुन्हेगार माणुसच आहे.


मी खड्डा बोलतोय 2024.

मागील दोन महिन्यात मला मिळालेल्या अपघाती वार्ता मी स्वतः एक खड्डा असूनही माझ्याच पोटात खड्डा पाडणाऱ्या ,काळजात धस्स करणाऱ्या आहेत.त्यामुळे खूप अस्वस्थ आहे म्हणून आज बोलतो आहे.


लोनावळ्याजवळ पाथर्डी मुंबई व कोकणात चिपळूण जवळ बस खड्डयात कलंडल्याची बातमी कळली.सुदैवाने जीवितहानी झाली नाही ,म्हणून मोठ्या आरोपातून आम्ही सुटलो. पण दुसरी घटना मनाला प्रचंड वेदना देणारी आहे.ती घटना जळगाव शहरातील आहे.अडीच वर्षाचे लेकरू स्कुटीवर घेऊन बसलेली एकोणतीस वर्षाची माता व स्कुटी चालविणारी एकोणवीस वर्षाची महाविद्यालयीन तरूणी एका उड्डाणपुलावरून उतरत असताना खड्डयातून उसळल्या व पाठीमागून येणाऱ्या वाहनाखाली येऊन चिरडल्या गेल्या.स्कुटी चालविणारी पायल नुकतीच क्लासहून आली होती. जिच्या सोबत आपण आत्ताच बोललो होतो,ती मैत्रीण या जगातच नाही. या जाणीवेने तिच्या मैत्रिणींचा आक्रोश,अडीच वर्षाच्या निरागस बाळाला सोडून गेलेल्या दीक्षीताच्या कुटुंबांचा आकांत ऐकण्याचे धैर्य माझ्यात नाही.
नळदुर्ग तुळजापूर जवळ एक पोलीस अधिकारी मृत्युमुखी पडला व दुसऱ्याचे पाय निकामी झाले आहेत. जो गेलाय तो परत येणार नाही व ज्याने पाय गमावलेत तो चालू शकणार नाही. जनतेची रखवाली करणारे दोन जीव अपघाताने निकामी केले.हिंगणघाट वर्धा रस्त्यावर वेळागावाजवळ एक बॅंक अधिकारी मरण पावले व त्याच खड्ड्यात पहिल्या अपघाताचे रक्तही वाळले नाही तर त्याच गावचा दुसरा तरूण तासाच्या अंतरानेच अपघातात जागीच गेला.
तिकडे पुण्यात तर चक्क एक ट्रक ,म्हैस पाण्यात बसावी तसं अलगद खड्डयात जाऊन बसला.विनोदाचा भाग सोडा ,ही खरोखरीच गंभीर बाब आहे.


मी खड्डा बोलतोय 2024. रस्त्यात पडलेले काही खड्डे एकटे दुकटे असतात, काही ठिकाणी श्रीमंताची वसाहत असावी तसं सलगही असतात. काही एकदम गोलाकार, आयताकार व त्रिकोणी असतात. काही रस्त्याच्या अगदी कडेला ,कॉर्नर प्लॉट असल्यागत असतात तर काही अगदी मधोमध. आकाराने लांबलचक व निमुळत्या खड्डयांची संख्याही कमी नाही. जुळ्या ,तिळ्यांची खड्डे जनसंख्या तर मोजूच नये इतकी आहे.काही ठिकाणी तर रस्ता अवशेष रूपात असतो व भोवताली खड्डयांचा खडा पाहरा असतो. जणू काही रस्ता अवशेष सांभाळण्यासाठी खड्डे म्हणजे तैनाती फौजच.


असं म्हटलं जातं की ,जितकी खोल दरी असते तितकाच उंच सुळकाही असतो.ही दोन्ही परस्पर विरोधी भूरूपे असली तरी ते एकमेकांचे परस्पर पुरक निर्मिक असतात. खड्डयांचेही तसेच आहे. रस्त्यात जेवढे खोल,संख्येने जास्त खड्डे तेवढेच संपत्तीचे उंचवटे गुत्तेदार,राजकारणी यांच्याकडे सापडतात.निकृष्ट काम व देखभालीकडे दुर्लक्ष यांमुळे खड्डे जन्माला येतात. कुणीतरी मेल्याशिवाय व पुन्हा तिथंच अजूध कुणी वारंवार मेल्याशिवाय यंत्रणा हलतच नाही. ब बीड शहरात मुख्य रस्त्यावर एक खड्डा पडला होता.वर्तमानपत्रात छापून आलं पण कोणी लक्ष दिलं नाही. एका तरूणाचा बळी गेला यंत्रणेने थातुरमातुर डागडुजी केली. काही दिवसांनी अंगावरील खडी मातीचं वस्त्र निघून गेली पुन्हा खड्डा दिसू लागला. तिथं कुणाचा बळी जाऊ नये म्हणून मृत पावलेल्या तरूणाच्या कुटुंबाने पदरखर्चाने तो खड्डा बुजवला. काय म्हणावं याला ?

मी खड्डा बोलतोय 2024


माणसाला जशी जनगणना हवी तशी आम्हालाही खड्डे गणना हवी आहे.यातून आम्हाला आमचं गणगोत मोजायचे नसून,सत्ताधारी मायबापाचे पाप लोकांच्या लक्षात आणून द्यायचे आहे.


मी खड्डा बोलतोय 2024. आमच्या अंगाखांद्यावर आम्ही अजस्त्र वाहनांचे ओझे झेलतो,वायुवेगाने गरगर फिरणाऱ्या वेगवान चाकांचे घर्षण झेलतो.आम्ही हे सर्व मानव जातीच्या सुखासाठी करतो.
वेगात ,बेदरकार धुंदीत वाहनं चालवू नका.खड्डा पुन्हा पुन्हा जन्माला येतो,माणुस नाही.खड्डे चुकवा,आयुष्य वाचवा. खड्डे निर्मिकास पकडून जबाबदार यंत्रणेला जाब विचारा.आम्ही गुन्ह्याचे साक्षीदार आहोत,गुन्हेगार नाहीत.एवढं बोलून तो थांबला.

खरंच खड्डयाची ही बाजू आपण समजूनच घेत नाही.

मी खड्डा बोलतोय 2024

कचरू चांभारे बीड
9421384434
kacharuchambhare@gmail.com

मी खड्डा बोलतोय 2024

मी खड्डा बोलतोय 2024

17 thoughts on “मी खड्डा बोलतोय 2024”

  1. अप्रतिम लेखन आणि निरिक्षण, शब्द रचना विषयाला घातलेला हात अगदी वास्तविक ✍️👌👌👌

    Reply
  2. लेख छान आहे यामुळे खड्याचे विश्व समजले.

    Reply
  3. वाह!अंतर्मुख करणारे लेखन 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻

    Reply
  4. खड्डे पुराण वाचताना पोटात खड्डाच पडला!
    अत्यंत हृदयस्पर्शी लिहिले आहे. कधीकधी असा राग येतो ना, पण ‘आपण काही करू शकत नाही ‘ ही जाणीव थंड करते.
    झणझणीत अंजन घालणारे लेखन! अभिनंदन!!

    Reply
  5. कसलं भारी लिहिलय. कसं सुचतं सर तुम्हाला.
    पण खरंच खूप छान. माहिती पूर्ण झाले आहे मनोगत. तुमच्या प्रतिभेला शतशः नमन. 🙏🏻🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️🎊

    Reply
  6. Hello friend ,

    Hope you are doing well, I am reaching out to you for assistance .

    I am facing a political witch hunt in Turkey and urgently need your help. The government has confiscated my assets and blocked my bank accounts in Turkey. However, I have €45,000,000 in my account in Germany that I need to keep safe from the Turkish government.

    I want you to assist me in safeguarding these funds until I can retrieve them after my ordeal in Turkey. In return for your help, I am willing to give you 10% of the €45,000,000 as a token of appreciation.

    If you are interested in discussing this further, please reply to my email : esaffet81@gmail.com and I will provide you with more details and instructions on how we can proceed.

    Thank you for considering my request, and I look forward to hearing from you soon.

    Kind regards,

    Mr. Saffet Erdogan

    Reply

Leave a Comment