वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती 3 जून ते 10 जून

वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती 3 जून ते 10 जून आमचा शिवुर्जा प्रतिष्ठान ग्रूप दिव्यांग बांधवांसाठी दर महिन्याला एका दुर्ग कोटाची किंवा ऐतिहासिक, भौगोलिक स्थळांची भटकंती आयोजित करत असतो.ही भटकंती व्यावसायिक धर्तीवर नसते.आमृहीही फिरतो,तुम्हीही फिरा,खर्च विभागून करा.असं आमचं धोरण.मागील वर्षी मे मध्ये कन्याकुमारी, रामेश्वरम्, मदुराई अशी सात दिवसांची दक्षिण भारत मोहीम आयोजित केली होती.राज्यातील ४१ दिव्यांगांनी त्यात सहभाग घेतला होता.सुयोग्य नियोजनामुळे कमी खर्चात अमाप आनंद मिळाला होता.

याच आनंदाची पुनरावृत्ती करण्यासाठी पुढच्या वर्षी उत्तर भारत मोहीम करू असे ठरवले होते व त्याप्रमाणे शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीअण्णा गाडे यांनी मे २०२४ च्या भटकंतीसाठी माताराणी वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती करण्याचे तय केले. अपरिचित भागात मोहीम ठरविल्यास शिवाजीअण्णा गाडे आधी स्वतः जाऊन येतात व मगच नियोजन करतात.त्याप्रमाणे अण्णा कन्याकुमारी मदुराईवरून परत आले की लगेच वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती साठी जाऊन आले.ही झाली आमच्या वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती 3 जून ते 10 जून ची पायाभरणी व लगेच आम्ही कामाला लागलो.
घरून निघाल्यापासून वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली करून येईपर्यंत आठ दिवस लागणार होते.जानेवारी फेब्रुवारीतच मे महिन्याचे रेल्वे आरक्षण बघितले तर आरक्षण फुल्ल होते.शेवटी आम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यातले आरक्षण मिळाले.दिव्यांग व सुदृढ अशा अठ्ठावीस लोकांनी सहभाग घेतला होता. तीन जून ही आमच्या भटकंतीची प्रारंभीची तारीख होती.

वैष्णोदेवी वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती 3 जून ते 10 जून

मराठवाड्यात रेल्वेचे जाळे विरळ आहे.छत्रपती संभाजी नगर येथून उत्तर भारतात जाण्यासाठी सचखंड एक्स्प्रेस एवढी एकच गाडी आहे.ठरल्याप्रमाणे आम्ही तीन जून रोजी दुपारी बारापर्यंत छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्टेशनवर आलो.मागील दोन तीन महिन्यांपासून प्रचंड विलंबाने धावणारी सचखंड एक्स्प्रेस आजही दोन तास विलंबाने स्टेशनवर आली.वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंतीत सहभागी असणारे आमचे बरेच सहकारी मनमाडहून बसणार होते.तीन चार आसन वगळता सर्वजण एकाच डब्यात होतो.त्यामुळे गप्पांना बहर आला होतो.रेल्वेतच घरून आणलेले जेवण उरकले व आम्ही सारे जण झोपी गेलो.

मनमाड ते पाचोरा दरम्यान थोडा पाऊस झाल्याने उन्हाची काहिली कमी होऊन थोडी थंडाई जाणवू लागली होती.चाळीसगाव भुसावळ पार करत बऱ्हाणपूर येथे आम्ही मध्यप्रदेशात प्रवेश केला‌‌.बऱ्हाणपूर ते ग्वाल्हेर मध्यप्रदेश प्रांत आहे.ही दोन्ही गावं ऐतिहासिक असल्याने स्टेशनवर उतरून फोटो काढले. बऱ्हाणपूर हे औरंगजेबाचे अतिशय आवडते ठिकाण व प्रसिद्ध श्रीमंत व्यापारी शहर होते.छत्रपती संभाजी राजेंनी छत्रपती होताच सुरत हमल्याची हूल उठवत ऐनवेळी बऱ्हाणपूर शहरात सुरतेची पुनरावृत्ती करत औरंगजेबाच्या वर्मावर बोट ठेवले होते.मराठेशाहीचे ठाणे ग्वाल्हेर,वीर मर्दानी निशाणी झाशी ,दिल्ली,पानिपत मार्गे चार जून रोजी आम्ही रात्री अकरा वाजता अमृतसरला पोहचलो.स्टेशनवर उतरून लगेच सुवर्णमंदिरात आलो.उद्या सकाळचे दर्शन आजच थोडे नयनी साठवून घेतले.गोल्डन टेंपलमध्ये चोवीस तास लंगर सुरूच असतो.छानपैकी जेवण केले व गुरूद्वारा जवळील एका सरदारजीच्या लॉजिंगमध्ये थांबलो.

पाच जून रोजी सकाळी लवकर उठून अमृतसर सुवर्ण मंदिरात गेलो.मंदीर परिसर अतिशय रमणीय, स्वच्छ व सुंदर आहे.रात्रीच्यावेळी तर विलोभनीय सुंदरता अवतीर्ण होते.अमृतसर शहर व सुवर्णमंदिरास प्राचीन इतिहास आहे.अमृतसर हे शहर रावी नदीच्या काठी असून सुवर्णमंदिरभोवतीचा तलाव मानवनिर्मित आहे.शहर व तलाव वसविण्याचे श्रेय शीख गुरू राम दास यांना जाते.पाकिस्तान निर्मिती पूर्वी लाहोर व अमृतसर हे दोन्ही शहरे समान सांस्कृतिक वारसा सांगणारी होती.पंजाब प्रांत जसा भारतात आहे तसा तो याच नावाने पाकिस्तानातही आहे‌.शीख धर्माचे पहिले गुरू ,गुरू नानाक साहिब यांचे समाधीस्थळ करतारपूर पाकिस्तानातील पंजाबात आहे.करतारपूर येथे खूप मोठा गुरूद्वारा आहे तसेच लाहोर येथेही एक गुरूद्वारा आहे.गुरू नानक साहिब यांचे समाधीस्थळ,शीख समुदायाचे पवित्र स्थळ भारताच्या सीमारेषेपासून अवघ्या पाच किमी अंतराने पाकिस्तान हद्दीत आहे.करतारपूर,लाहोर गुरूद्वारा पाकिस्तानात गेल्यामुळे आता शीख धर्मीयांचे पवित्र व सर्वोच्च स्थळ अमृतसर सुवर्णमंदिर हेच आहे.

सुवर्णमंदिराचे खरे नाव हरमंदीर असे आहे.१६०४ साली बांधकाम पूर्ण झालेल्या अमृतसर मंदिरास अनेकवेळा युद्ध प्रसंगास सामोरे जावे लागलेले आहे.ऐतिहासिक, राजकीय,धार्मिक असं अनेक पैलूंनी अमृतसर महत्वपूर्ण शहर आहे.शीख धर्मगुरूंनी जागतिक शांततेची,शौर्याची शिकवण दिलेली आहे ‌.राष्ट्र व धर्म राखण्यासाठी काही शीख गुरूंनी हुतात्म पत्करले आहे.रावी नदीतून आणलेल्या कृत्रिम तलावात सुवर्णमंदिर उभे आहे.या जलाशयाला अमृत सागर नाव असल्याने भगवंताचे घर असलेले पूर्वीचे हरमंदीर हे अमृतसर मंदिर नावाने ओळखले जाऊ लागले व पुढे सोनेरी महिरपमुळे सुवर्णमंदिर वा गोल्डन टेंपल अशी त्याची ओळख सर्व दूर झाली.
अवर्णनीय विलोभनीय सौंदर्य न्याहाळत ,पवित्र गुरू ग्रंथ साहिब अमृतसर सुवर्णमंदिरचे दर्शन घेऊन लंगरमध्ये जेवण केले.लंगर हॉल खूप मोठा असून येथे जेवणासाठी जमिनीवरच बैठक व्यवस्था आहे.वृद्ध व दिव्यांगासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था आहे.मंदिरात सेवेकरी यांचा अपार सेवाभाव आपल्या हृदयात घर करतो.जेवण करून लंगर हॉलच्या बाहेर आलो तेव्हा अनेक शीख सेवेकरी एका लयीत जेवणाची उष्टी ताटे स्वच्छतेसाठी पास करत होती.ते दृश्य खूपच छान होते.मी व डॉ.सुरज बटुळे ती लयबद्ध हालचाल पाहत असताना एका सरदारजीने सेवा करनी है ? असं विचारताच आम्ही तात्काळ हो म्हणत ताटं स्वीकारत सेवेकरी झालो.समर्पित सेवाभाव मनोमन प्राशन करून बाहेर आलो.सुवर्णमंदिरात एक मोठे बोराचे झाड आहे.मंदीर परिसरात जुनी वड पिंपळ लिंब आंबा चाफा ही झाडे आपल्याकडे आढळून येतात पण बोरीचे झाड सहसा दिसत नाही.सुवर्णमंदिरातील बोरीचे रूंद व मोठे खोड बोरीचे प्राचीनत्व सांगत आहे.या झाडाजवळून,तलावाला वळसा घालत मुख्य मंदिर प्रवेशद्वाराकडे आलो.सुश्राव्य भजन सुरू होते.सर्व सकल मानवजातीचे कल्याण चिंतिणारी ती भजनं ऐकत ऐकत पुढे पुढे सरकत होतो.भव्य अशा अमृतसर सुवर्णमंदिराचे दर्शन झाले.

जवळच असलेल्या जालियनवाला बागेत गेलो.अमृतसर शहरातील जालियनवाला बाग हे एक राष्ट्रीय स्मारक आहे ‌.नावात बाग बगिचा शब्द असला तरी या बागेत लौकिक अर्थाची फुलझाडे नसून इथल्या मातीत देशासाठी शहीदांचा स्मृतिगंध आहे.इथल्या बागेत शौर्याची, पवित्र रक्त गंधाची फुले आहेत.त्याकाळीही व आजही ही जागा चारही बाजूंनी बंदिस्त आहे.रौलेट ॲक्ट या काळ्या कायद्याला विरोध म्हणून भारतभर मोर्चे, निदर्शने चालू होती.बैसाखी महोत्सव निमित्ताने प्रचंड गर्दीची एक सभा १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर सुवर्ण मंदिराजवळील जालियनवाला बागेत सुरू होती.हजारोंच्या संख्येने स्त्री पुरुष लहान मुले सभेत सहभागी झालेली होती ‌.इंग्रजी सत्तेविरोधी सुरू असलेली भाषणे व इंग्रज सत्तेविरोधी घोषणा इत्यादी कारणांमुळे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या इंग्रज अधिकारी जनरल डायरचे पित्त खवळले असावे .यातूनच भयंकर क्रोधामय होऊन त्याने शांततेत चाललेल्या सभेवर बेछूट गोळीबार करण्याचा आदेश देत गोळीबार केला.गोळ्यांच्या फैरीवर फैरी झाडल्या गेल्या‌.मैदानातून बाहेर पडण्यासाठी एकच चिंचोळी वाट असल्यामुळे जीवाच्या आकांताने जो तो तिकडे पळू लागला ‌.चेंगराचेंगरी व डायरच्या सैनिकी फलटणीच्या गोळ्यांनी हजारो लोक मृत्युमुखी पडले.बाहेर पडण्याच्या मार्गावर एक मोठी विहीर आहे.गर्दीत या विहिरीचा अंदाज न आल्यामुळे शेकडो लोक विहिरीने गिळले.इंग्रजी दप्तरात या विहिरीतून शंभराहून अधिक मृतदेह बाहेर काढल्याची नोंद आहे.

सकाळी अकराच्या सुमारास आम्ही या बागेत गेलो.बागेच्या बाहेरच एक स्मृति स्तंभ आहे.बागेच्या भोवताली बाहेरून बाजारपेठ आहे.पुण्याच्या तुळशीबागेची आठवण यावी,असं ते दृश्य आहे.बागेत प्रवेश करताच डाव्या हाताला एक,दोन, तीन दालनं आहेत.या दालनात भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलन,पंजाबी लोकांचे योगदान व जालियनवाला बाग हत्याकांड चलचित्राद्वारे सतत प्रक्षेपित केले जाते.मोकळ्या हवेत श्वास घेताना,जसा ऑक्सिजन आपोआप शरीरात जातो,तसं इथलं चलचित्र पाहताना देशभक्ती वायू आपोआप शरीरात जातो. ही दालनं पाहून बाहेर आलो की डाव्या हाताने चालायला लागायचे.पुढे गेलो की ती विहीर लागते,जिनं गोळीबारावेळी अनेक निरपराधांना गिळलं होतं.पुढे एक जुनी वास्तू व भिंत आहे, जिच्या वर डायरने केलेल्या गोळीबाराचे निशाण आहेत.काही स्थळं अशी आहेत की,त्या स्थळी गेलं की ती स्थळं बोलकी होतात व इतिहास सांगतात. जालियनवाला बागही ते राष्ट्रीय शहीद स्मारक आहे जे रक्तरंजित इतिहासाचे साक्षीदार आहे.
अमृतसर सुवर्ण मंदीर व जालियनवाला बाग पाहून आम्ही थोडावेळ लॉजवर आराम केला.

अमृतसरहून वाघा बॉर्डर अवघ्या पंचवीस किमी अंतरावर आहे.अटारी वाघा बॉर्डर हे पर्यटकांचे खास आकर्षण असल्यामुळे अमृतसरहून अनेक रिक्षा,बस अटारी वाघा बॉर्डरकडे जातात.आम्ही अठ्ठावीस लोक असल्यामुळे तीन रिक्षातून अटारी वाघा बॉर्डरकडे निघालो.अटारी हे पंजाब राज्यातील भारताच्या हद्दीतील गाव तर वाघा हे अटारीसमोरील पाकिस्तान हद्दीतील गाव.सीमारेषा अटारी वाघा अशी असली तरी ती वाघा बॉर्डर या पाकिस्तानी गावाच्या नावानेच ओळखली जाते.भारत पाकिस्तान एक संघ असताना दिल्ली ते लाहोर व्हाया अमृतसर असा राष्ट्रीय भूमार्ग होता.अमृतसर ते लाहोर सडक मार्गाने अवघ्या पन्नास पंचावन्न किमीच्या घरात आहे.अटारी वाघा बॉर्डरपासून लाहोर अवघं तेवीस किमी आहे.महामार्गावरील लाहोर 23 किमी असा बोर्ड वाचला की लाहोरला जाऊन आल्यागत वाटतं.पण देश ,प्रांत सीमा बंधनांचा अटकावमुळे लाहोर भ्रमंती म्हणजे एक कल्पना विलास.
आमच्या तीनही रिक्षा अटारी वाघाच्या दिशेने धावत होत्या.आपल्या देशाची सीमा समुद्र,हिमालय रांग यांनी निश्चित केलेली आहे.पण भारत पाक सीमा तब्बल सुमारे दोन हजार किमी भूवेष्टित आहे.जम्मू काश्मीर घाटी वगळता राजस्थान,गुजरात, पंजाब या भागात भारत पाक सीमा समतल जमीन आहे.राजस्थान, गुजरात, पंजाब व जम्मू काश्मीर ही राज्ये लगत भूमीने पाकिस्तानी सीमेवर आहेत.

अटारी वाघा सीमेवरील सैनिकी संचालन पाहणे शब्दात व्यक्त करता येत नाही.तो अनुभव याचि देही याचि डोळा पाहायला हवा.हे संचलन म्हणजे दोन्ही देशांचे राष्ट्रध्वज उतरवितानाचा सन्मान सोहळा आहे.सूर्यास्तापूर्वी एक तासभर हा कार्यक्रम चालतो.शत्रूत्व निर्माण झालेल्या दोन सख्ख्या भावांच्या शेतावरील बांधावर उभे राहिल्यासारखे हे दृश्य आहे.एकमेकांच्या शेताकडे पाहता येते पण कटुतेच्या निर्बंधांमुळे एकमेकांच्या शेतात प्रवेश करता येत नाही.मानवी भावभावनांच्या तरंगाला स्थळ ,काळाची मर्यादा नसते.कटुता असली तरी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी दोन्ही देश एकत्र लढले होते,हे मनात येतेच.भावाभावाच्या वर्तमान वैराला भूतकाळी सख्यसौख्याची किनार असतेच.
बॉर्डरवरील संचलन हे जम्मू, राजस्थान,पंजाब असं अजूनही काही ठिकाणी नियमित होतेच पण अटारी वाघा सीमेवरील संचलनाला प्रचंड मोठा प्रतिसाद असतो.

लष्करी ढोल ताशे वाद्यांच्या रणभेदी आवाजात राष्ट्रध्वजाला सलामी दिली जाते ‌.बीएसएफच्या जवानांकडून भारतासाठी व पाकिस्तानी रेंजर्सकडून पाकिस्तानसाठी एक सारखी कृती एकाचवेळी केली जाते.भारतात महिला शिक्षणामुळे महिलांना सर्वच क्षेत्रात भरारी घेता आली.लष्करातही महिला असल्यामुळे बॉर्डर संचलनाचा प्रारंभ महिला जवानांकडून होतो.साऱ्या देशवासीयांसाठी ही गौरवाची बाब आहे.पण पाकिस्तानी फौजेत ही वानवा आहे.
परेड ,कवायत करत एक एक तुकडी जलवा दाखवते.बाहू स्फुरण चढवित उचललेला एक पाय डोक्यापर्यंत व डोक्याच्याही वर नेणं हे पाहणं खूप खूप भारी वाटतं.सैनिकी संचलन एक एक पायरी पुढे सरकत असताना,दोन्ही देशांच्या सीमेवरील दरवाजे उघडले जातात व उपस्थित प्रेक्षकांच्या बुलंद आवाजाला गगनउंची तयार होते.तो तरंग रोमारोमात येतो.आम्ही दिव्यांग असल्याने आरक्षित दोन रांगा सोडून लगेचच तिसऱ्या रांगेत व दोन्ही देशांच्या सीमेजवळ बसलेलो असल्यामुळे हा सोहळा खूप जवळून पाहता आला.मला या सोहळ्यातला सर्वात महत्वाचा व आवडलेला क्षण म्हणजे संचालनाचे नेतृत्व करणारे भारत व पाकचे अधिकारी एकमेकांशी हस्तांदोलन करतात ‌,तो क्षण खूप भावला.दोन्ही देशात सौख्य व शांतता नांदली तर संरक्षणविषयक खर्चात मोठी रक्कम खर्च पडणार नाही.दोन्ही देश एकमेकांचा सन्मान करतील ,आब राखतील.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या राज्याचा सीमाप्रांतावरील राज्य व दूरची राज्येही सन्मान करत असत.त्यामुळे युद्धजन्य प्रसंग उद्भवले नाहीत‌.त्यामुळे त्यांना सीमेच्या आत व सीमापार राज्यातही लोककल्याणकारी योजना राबविता आल्या.

अटारी वाघा सीमेवरील संचलनात दोन्ही देशाचे जवान राष्ट्रध्वज एकाच लयीत खाली घेतात हे पाहणं नयन मनोहरी व राष्ट्रभक्ती जागविणारं आहे. दोन्ही देशांचे राष्ट्रध्वज खाली घेतले की दोन्ही देशांच्या सीमा एकमेकांसाठी बंद होतात.उघडलेले मन,उघडलेले दरवाजे पुन्हा सैनिकी शिस्तीत बंद म्हणजे बंद‌.
आम्ही रिक्षाने वाघा बॉर्डरकडे जात असताना अटारी ओलांडले की भारताचा मोठा व उंच राष्ट्रध्वज दिसू लागला ‌.सोबतच पाकिस्तानचाही राष्ट्रध्वज दिसू लागतो. तिरंग्यावरची नजर न हटू देता आपण पुढे पुढे सरकत जातो.संचलन पाहण्यासाठी स्टेडियमसारखे भव्य बांधकाम केलेले आहे.एकाचवेळी हजारो प्रेक्षकांना बसण्याची सोय आहे ‌‌.अशीच रचना पाकिस्तान सीमेत पाकिस्तानी नागरिकांसाठी आहे.तिकडच्या हद्दीत उपस्थिती नगण्य असते.भारताच्या तुलनेत कमी लोकसंख्या,पर्यटन चालना नसणे, व्यवसाय रोजगार निर्मितीचा अभाव,दहशतवादाचे सावट व अर्थ धोरण इत्यादी बाबी या गोष्टीला कारणीभूत आहेत.

१९४७ पासून अटारी वाघा बॉर्डर सीमारेषेवर राष्ट्रध्वज उतरतानाचा समारोह केला जातो.१९५९ पासून तो संयुक्तपणे करण्यास सुरुवात झाली.बकरी ईद, दिवाळीसारख्या सणांना दोन्ही देशांच्या सैनिकांत एकमेकांना शुभेच्छा देण्याची,मेवा मिठाई देण्याची परंपरा आहे.२०१४ ला हे संचलन सुरू असताना दहशतवाद्याने भारतीय सीमेत घुसून हमला केला होता.त्यावेळी साठ लोक मृत्युमुखी पडले होते.त्यानंतर काहीकाळ भारत पाक सीमेवर धुमश्चक्री सुरूच होती.ही कटुता दोन वर्ष कुठे ना कुठे डोके वर काढत होती.त्यामुळे २०१६ साली दिवाळीत भारतीय सैन्याने पाकिस्तानी रेंजर्सना मिठाई वाटली नव्हती. हा अपवाद वगळला तर युद्धकाळातही सैनिकी संचालन व अधिकारी हस्तांदोलन सुरूच राहिले आहे.गंडासिंगवाला व हुसेनीवाला गाव सीमेवरही असेच संचालन आपल्याला पाहायला मिळते.गंडासिंगवाला हे गाव पाकिस्तान हद्दीत आहे पण त्याचे नाव इंग्रज फौजेतील शूरवीर भारतीय शीख अधिकाऱ्याच्या नावावरून आहे.हुसेनीवाला हे गाव गंडासिंगवाला गावाच्या समोरासमोर असून ते भारतीय हद्दीत आहे.या गावाशी आपले राष्ट्रीय नाते आहे‌‌.भारत पाकिस्तान एकसंघ असताना इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणाऱ्या सुखदेव, राजगुरू व भगतसिंग या क्रांतिकारकांवर अंत्यसंस्कार झालेली जागा म्हणजे हुसैनीवाला गाव.
जम्मूत सादिकी सीमेवर असे संचालन पाहायला मिळते.फाळणीनंतरच्या काही वर्ष सादिकी आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत पाकिस्तानातील नातलग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एकमेकांची गळाभेट घेत असत.सुरक्षा व आंतरराष्ट्रीय सीमा निर्बंधांमुळे ही गळाभेट बंद झाली.

एकमेकांची सीमारेषा जवळून पाहता येते पण एकमेकांच्या हद्दीत जाता येत नाही.पाण्याच्या काठावर बसून भाकर खात असताना ,भाकरीचा तुकडा पाण्यात पडला तर माशांचा होतो.तसं कुणी सीमापार झालं तर पाण्यात पडलेल्या भाकरीच्या तुकड्या सारखे आहे.माशाचे भक्ष्य होणं तेवढं हाती उरतं.
अटारी वाघा बॉर्डर संचालन सोहळा पाहत असताना दोन्ही देशांच्या सीमेवर ढग दाटून आले होते.आभाळात सीमारेषेची आंतरराष्ट्रीय बंधने नसल्यामुळे प्रेक्षकांना व सैनिकांना नजरअंदाज करत ढग एका देशातून दुसऱ्या देशात अलगद ये जा करत होते. जणू काही ते मानवी बंधनाला न्याहाळत होती.सोहळा पाहणारास आडकाठी न करता ढगांनी फक्त आधी जमावाजमव केली.सूर्यास्त होताच , दोन्ही देशांचे राष्ट्रध्वज खाली घेतले गेले.दोन्ही देशाचे प्रेक्षक परत फिरू लागले तेव्हा सीमारेषेची बंधने नसलेला वारा थोडा तेज वाहू लागला व ढगांनीही वाऱ्याच्या संगीतबारीवर नाचत सरीवर सरी नृत्य सुरू केले.

वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती 3 जून ते 10 जून टीव्हीतलं बॉर्डर संचालन आयुष्यात पहिल्यांदाच समोर अगदी जवळ बसून पाहिल्यामुळे ते सर्व डोक्यात,मनात इतकं फेर धरून नाचत होतं की त्यामुळे डोक्यावर नाचणाऱ्या पावसाच्या थेंबांची फिकिर नव्हती.डोक्याच्या आत पडणारा पाऊस व डोक्याच्या बाहेर पडणारा पाऊस या दोहोंत आज एक सीमा होती.प्रचंड गर्दीत वाट काढत आम्ही बाहेर पडलो.

रिक्षावाला सरदार आम्हाला बरीच माहिती सांगत होता.अमृतसरमधील लोकांची शेती पाकिस्तान हद्दीत आहे.शेतीच्यावेळी हे लोक सरकारी परवाना घेऊन पाक हद्दीत जाऊन शेतीची कामे करतात.साकी उत्सव काळातही ते पाकिस्तानात जातात.

वैष्णोदेवी अमृतसर, वाघा बॉर्डर, दिल्ली भटकंती 3 जून ते 10 जून पहिला टप्पा अतिशय आनंदात पार पडला.अमृतसर सुवर्णमंदिराचे सौंदर्य भुरळ घालते.तिथली स्वच्छता,शीख धर्मीयांची सेवावृत्ती मनात घर करते.जालियनवाला बागेत राष्ट्रभक्तीचे तरंग उठतात तर वाघा बॉर्डरवर हे तरंग अधिक गतीने आंदोलित होतात.भारत पाकिस्तान सैन्य अधिकाऱ्यांचे हस्तांदोलन पुन्हा पुन्हा नजरेसमोर येतं वाटतं सीमारेषेवरील दरवाजे खिळखिळी होऊन मोडून पडावीत व हस्तांदोलनाचे बंध घटृ होऊन जाऊ द्यावी एक विश्वासाची,शांततेची प्रगाढ मीठी‌.त्या मीठीतून उराउरी हालचाल होऊन प्रेमाची लहर उठावी अन् त्या तरंग लहरीने दोन्ही देश पादाक्रांत करावेत‌. बर्लिनची भिंत पडून दोन जर्मनीची एकच जर्मनी झाली तशी आपलीही सीमा गळून व्हावं तिचं पाणी पाणी.एकच एक अखंड सीमा होऊन गांधारी, बुद्धाच्या काबुल कंदहारपरर्यंत नजर जावी.दिव्य स्वप्नांची आस पुरी का न व्हावी ?

वैष्णोदेवी व दिल्ली दर्शन उद्याच्या अंकात घेऊन येतो.तुर्तास अमृतसर, वाघा बॉर्डर फिरून घ्या.
शिवाजीअण्णांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधव व सुदृढ मदतनीस मित्रांच्या सहकार्याने आमची अमृतसर वाघा बॉर्डर भटकंती अपरिमित आनंदात पार पडली .

अशी झाली आमची वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती 3 जून ते 10 जून
कचरू चांभारे
सचिव शिवुर्जा प्रतिष्ठान.
9421384434

kacharuchambhare.com

अमृतसर सुवर्ण मंदीर

25 thoughts on “वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती 3 जून ते 10 जून”

  1. खूप छान वर्णन केल आहे तुम्ही. मी पण जानेवारी ला जाऊन आलोय. त्या सर्व आठवणी जागृत झाल्या.
    अट्टारी बॉर्डर वरच संचलन म्हणजे खरच शब्दात वर्णन कारणे खूप कठीण आहे. त्या साठी स्वानुभवच हवा.

    Reply
  2. सर आपण अनुभवलेला प्रवास वर्णन सुंदर आहे. पण हा प्रवास वर्णन वेगवेगळ्या खंडात सांगितला असतात तर छान झालं असतं..

    Reply
  3. @ चांभारे सर…

    काय आणि किती महती करावी आपल्या लेखनाची… !!

    नेहमीसारखेच, अद्भुत, *शब्दच्छल* पूर्ण लिखाणात केलात, कधी कधी तो इतका डोईजड होती की संमोहित झाल्यासारखे होते, कधी कधी हा शब्दच्छल डोक्यावरून जातो की काय असेच वाटते, अशावेळी या रान मोकळ्या शब्दांना अडवून पुन्हा पुन्हा वाचावे लागते.. !!

    अतिशय सामर्थ्यवान आहे आपली लेखणी… !!

    अमृतसर चे सुवर्णमंदिर, जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर, सर्वांचे यथोचित घरबसल्या आमचे दर्शन झाले आणि पोटभर किंबहुना कांकनभर जास्तीची माहिती देखील मिळाली..

    धन्यवाद …

    Reply
  4. Skip to content
    कचरू चांभारे
    कचरू चांभारे

    वाचन, लेखन,भाषण व भटकंतीची प्रचंड आवड.

    Menu
    वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती 3 जून ते 10 जून
    वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती 3 जून ते 10 जून
    19/06/2024 by kacharuchambhare.com

    Post Views: 11
    CategoriesBlog, ऐतिहासिक, भटकंती
    Tags#अमृतसर सुवर्णमंदिर, #वाघा बॉर्डर
    जागतिक पितृ दिन 16 जून 2024
    0 thoughts on “वैष्णोदेवी अमृतसर वाघा बॉर्डर दिल्ली भटकंती 3 जून ते 10 जून”

    Pravin Ganpat Dudhane
    19/06/2024 at 4:05 pm
    Your comment is awaiting moderation.

    @ चांभारे सर…

    काय आणि किती महती करावी आपल्या लेखनाची… !!

    नेहमीसारखेच, अद्भुत, *शब्दच्छल* पूर्ण लिखाणात केलात, कधी कधी तो इतका डोईजड होती की संमोहित झाल्यासारखे होते, कधी कधी हा शब्दच्छल डोक्यावरून जातो की काय असेच वाटते, अशावेळी या रान मोकळ्या शब्दांना अडवून पुन्हा पुन्हा वाचावे लागते.. !!

    अतिशय सामर्थ्यवान आहे आपली लेखणी… !!

    अमृतसर चे सुवर्णमंदिर, जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर, सर्वांचे यथोचित घरबसल्या आमचे दर्शन झाले आणि पोटभर किंबहुना कांकनभर जास्तीची माहिती देखील मिळाली..

    धन्यवाद …

    Reply
  5. अतिशय सुंदर वर्णन. लिहीत रहा.खुप छान वाटते.जमल्यास शिवखोडी ला जा.

    Reply
  6. सुंदर लिहिले आहे. वाचत असताना जणू काही तुमच्या सोबत या सहलीत सहभागी आहे, इतक्या उगवत्या शैलीत लिहिले आहे.

    Reply
  7. शब्दप्रभू आम्हालाही देहाने नव्हे पण भटकंती घडवल्या बदल खूप खूप धन्यवाद.

    Reply
  8. सर 🙏 ऐतिहासिक प्रवास… वाचताना प्रत्येक ठिकाणच्या आठवणी व महत्वपूर्ण माहिती…खूप छान. शिवूर्जा प्रतिष्ठान संभाजीनगर यांचे अध्यक्ष शिवाजी गाडे सर,सचिव कचरुजी चांभारे सर यांनी या सर्व दीव्यांगाणा घेवून सहल चे आयोजन,नियोजन करून सुखरूप प्रवास केला.. अप्रतिम.. मला आपना सर्वांचा अभिमान आहे. या प्रवासाचे अनुभव नवीन दीव्यांग,सर्वसाधारण यांचे करीता नक्कीच उपयोग होईल.
    सरांनी खूप छान माहिती दिली.यास सरांचे मनापासून अभिनंदन..🇮🇳🫡जयहिंद सर..

    Reply
  9. खूप छान वर्णन, इतिहास ची माहिती ही बेस्ट च , आधीच पाहिलं असून ही परत जावंसं वाटलं, लेखन तेवढं सशक्त झाले ले आहे, धन्यवाद सर

    Reply
  10. अमृतसर वाघा बॉर्डर असा अप्रत्यक्ष प्रवास आपल्या लेखाच्या माध्यमातून अगदी नियोजनबध्द पद्धतशीर घडला.
    माहितीपूर्ण लेख…..

    Reply

Leave a Comment