शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024
शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

शिक्षक संस्कार व संस्कृती हे एखाद्या गुणाचे ,थोड्या काळापुरते प्रतिनिधित्व नसते तर संस्कार व संस्कृती अनेक गुणांचा समुच्चय असून तो सातत्याने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा व्रत बंध असतो.संस्कार व संस्कृतीचे वहन करणारा पहिला घटक कुटुंब व दुसरा घटक समाज असतो परंतु संस्कार व संस्कृतीचे सामुहिक वहन करणारा सर्वात मोठा घटक शिक्षक असतो.पुस्तकी शिक्षण देणारा गुरूजी व पुस्तकाच्या आधारे पुस्तकाबाहेरचं जग दाखविणारा गुरूजी कायमस्वरुपी आठवणीत राहतो.


शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

गुरूविण नाही उद्धार

शिक्षक दिनाच्या औचित्यावर मी माझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यातील गुरूजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे.वेगवेगळे टप्पे यासाठी निवडले की शिक्षणप्रवासाची वाट छोटी नाही.दीर्घ वाटेवर प्रवास करताना एखाद्या वळणावर जरी आपण भरकटलो तरी अज्ञात वाटेवरच्या निबिड अरण्यातून पुन्हा मुळ वाटेवर येणं अवघडच असतं.माझ्या आयुष्यातला प्रत्येक गुरूजी माझ्यासाठी ध्रृव तारा,दीपस्तंभ आहे.तरीही त्यातल्या त्यात सर्वोत्तम ,माझ्या आयुष्याचे शिल्पकार वाटले ,अशा काही गुरूजनांबद्दल लिहितो आहे.

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

प्राथमिक शिक्षण श्री.महादेव रामभाऊ नजन


प्राथमिक शिक्षक,प्राथमिक पदवीधर शिक्षक,मुख्याध्यापक व शेवटी केंद्रप्रमुख या चढत्या क्रमाने शिक्षणसेवेतील सर्व सेवा बजावून दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेले नजन सर माझे तिसरी ते सातवीचे वर्गशिक्षक व प्राथमिक स्तरावरचे इंग्रजीचे शिक्षक.माझ्या आयुष्याचे शिल्पकार.

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक श्री.नजन सर


साधारण पंच्याऐंशीची गोष्ट असेल.नजन सरांची प्राथमिक शिक्षक म्हणून प्रथम नियुक्ती माझ्या जन्मगावीच म्हणजे जातेगाव ता.गेवराई.आमची जिल्हा परिषदेची शाळा तेव्हा सातवीपर्यंत होती.त्यावर्षी एकाच वेळी पोरसवद्या वयातील तीन चार शिक्षक व दोन तीन शिक्षिका आमच्या गावात नव्यानेच रूजू झाली होती.नजन सर त्यापैकी एक.दळणवळणाची साधने मुबलक नसल्यामुळे त्यावेळी आमच्या गावात चाळीसएक शिक्षक राहत होती.पांढरपेशी संस्कृतीतला तो आमच्या गावातला सर्वोत्तम सुवर्णकाळ .नजन सर अतिशय विनोदी व्यक्तिमत्व.मुलात मूल होऊन शिकविणे म्हणजे काय ? याची व्याख्या कळायला मला स्वतःला शिक्षक व्हावे लागले.मग आता कळले की नजन सर जे आमच्यासोबत वागत होते त्याला मुलात मूल होऊन शिकविणे म्हणतात.अतिशय कडक शिस्त पण वात्सल्याचा उमाळाही तितकाच.एकाच डोंगराच्या एका बगलेत खोल दरी व दुस-या बगलेत उंच पर्वत कडा असावा तसं कडवी शिस्त व कमालीचं वात्सल्य मी नजन सरांत अनुभवलं.सरांना मी सर न म्हणता जीजा या कौटुंबिक नावानेच बोलत असे व आजही तेच संबोधन कायम आहे.माझ्यातील वक्तृत्वाचे धडे त्यांनीच गिरविले.आमच्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षेवेळी आम्हाला गेवराई परीक्षा केंद्र होते.भाकरीचे गाठोडे माझ्या सांभाळी घालून बाकीची मुलं मुली बाथरूमला गेली होती.नजन सर बोर्डवर आमचे हॉल क्रमांक शोधत होते.मी जिथं थांबलो होतो ,तिथं शेजारी एक सर आपल्या विद्यार्थ्यांना गणित सोडवून सांगत होते.ते गणित पाहण्यात मी कधी सामील झालो ते कळलेच नाही.त्यावेळी गेवराईच्या शाळेत डुकरांचा फार सुळसुळाट होता.गोठ्यातील वासराच्या उंचीचं एक एक धिप्पाड डुक्कर होतं.मी दुसऱ्या सरांचे गणित समजून घेत असताना ,तिकडे डुकरांची स्वारी आमच्या भाकरीवर तुटून पडली.बघता बघता भाकरीची सगळी गाठोडे पसार.भाकर खायला भेटणार नाही याहीपेक्षा सरांचा मार खायला भेटणार.ही पोटात उठलेली कळ भयंकर होती.पण नजन सर थोडेसुद्धा रागावले नाहीत.उलट त्यांनी आम्हाला हॉटेलमध्ये पुरी भाजी खाऊ घातली.ते आम्हा मुलांचं पहिलं हॉटेलमधलं जेवण.पाठ ,पोट व मेंदू यांची काळजी वाहणारा गुरूजी म्हणजे नजन सर.
सरांचे अध्यापन अतिशय सरस ,एक गणित विषय वगळला तर सर्व विषयात जबरदस्त हातखंडा.आजही मी जीजाच्या संपर्कात आहे.मला सरांनी मुलाची माया दिली.

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

  माध्यमिक शिक्षण :

श्री.राजेंद्र भास्कर जगदाळे सर

जगदाळे सर

प्राथमिक शिक्षणातली मुळाक्षरे गिरवून आपण माध्यमिक शिक्षणात प्रवेश करतो.प्राथमिक शिक्षणात मिळालेल्या बाळकडू वर माध्यमिक शिक्षणाचा पाया असतो.जगाशी जोडणारं खरं शिक्षण माध्यमिक शिक्षणात असतं.या टप्प्यावर मुलांत शारीरीक व मानसिक स्थित्यंतर झालेले असते.पुढील आयुष्याची खरी जडणघडण माध्यमिक शिक्षणातच होत असते.इथं व्यवस्थित पैलू पडले तरच दगडाचा देव होतो नाहीतर अडगळीत पडलेला दगड राहावे लागते.
चार महिन्यापूर्वी शारदा विद्यामंदीर गेवराई शाळेतून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले राजेंद्र जगदाळे सर माझे आठवी ते दहावी मराठीचे शिक्षक.माझ्या अवांतर वाचनाच्या गोडीतला सगळा हिस्सा यांचाच.तसेच माझ्या वक्तृत्व शैलीला पैलू जगदाळे सरांच्याच कारखान्यात पडले.आणि विशेष आनंदाने सांगायची गोष्ट म्हणजे जगदाळे सर माझ्या आयुष्यात आले नसते तर कदाचित शाळा नावाच्या पटावर मी कधीच उभा राहू शकलो नसतो.

अतिशय गोड स्वभाव ,तितकीच मधाळ वाणी हे जगदाळे सरांचे खास वैशिष्ट्ये .मराठीचा एखादा पाठ शिकविताना लेखकाचा परिचय देण्यास सहा सात तासिका देणारा एकमेव गुरू म्हणजे जगदाळे सर.आमच्या शाळेतलं ग्रंथालय त्यांनी माझ्याकडेच दिलं होतं.झपाटल्यागत वाचलं व इतरांनाही वाचायला लावलं.माझे गुरूजी हे पुस्तक कसे आहे ?असं विचारायचे व पुस्तक वाचायला घ्यायचे. तेव्हा किती आनंद होई हे शब्दांत सांगता नाही येणार. माझ्या वाचन समृद्धीचे शिल्पकार जगदाळे सर आहेत.

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024


तेव्हा आमच्या माध्यमिक शाळेत जबर शिक्षा केली जात असे.सातवी उत्तीर्ण होईपर्यंत मी कधीच मार खाल्ला नव्हता व पुढेही मार खाईल असं वाटतच नव्हतं.तरीही इतरांना मारलेलं पाहून शिक्षेच्या काल्पनिक भीतीने मी आठवीत शाळा सोडली होती.काहीही कारण नसताना मी शाळा सोडून मेंढरामागे फिरत होतो.शाळा सोडण्याची मानसिकता होण्याचे दुसरं कारण म्हणजे थोडंसं राजकीय स्पर्श असलेलं होतं.

आमच्या गावात 1919 पासून सरकारी शाळा होती.पुढे ती शाळा निजाम सरकारने चालूच ठेवली.नंतर ती जिल्हा परिषदेकडे आली‌.जिल्हा परिषद व्यवस्थापनात ती पहिली ते दहावी अशी प्रशाला होती.
खाजगी शाळांच्या आरंभीच्या टप्प्यात साधारण ऐंशीच्या दशकात म्हणजे माझ्या जन्म वर्षाच्या आसपास जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाने जातेगाव येथे आठवीचा वर्ग सुरू करत यमादेवी विद्यालय ही खाजगी शाळा उघडली .जिल्हा परिषद प्रशालेच्या इमारतीतच हा वर्ग सुरू झाला या पहिल्या शाळेचे मुख्याध्यापक होते गोविंदराव शेळके सर व सोबतीला फक्त एक शिक्षक होते रघुनाथ जाधव सर. पुढे हळू हळू ही शाळा दहावीपर्यंत वाढत गेली व नंतर काळाच्या ओघात रिवर्स गिअर टाकत सातवी ते पाचवी झाली.पुन्हा एकदा टॉप गिअर टाकत अकरावी, बारावीही झाली.

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

1990 ची गोष्ट आहे मी तेव्हा सातवीत जिल्हा परिषद शाळेत शिकत होतो.त्या वर्षी विधानसभा निवडणूक लागलेली होती.गेवराई विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडीत व शिवसेनेकडून स्व.वैजिनाथ येवले निवडणूक लढवत होते.सभेला त्यावेळी शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी सिने अभिनेते दादा कोंडके गेवराई येथे येणार होते.दादा कोंडके येणार म्हणून त्यांना पाहायला मी जातेगाव गेवराई बसने हाफ तिकिट काढून एक रूपयांत गेवराईला आलो होतो.


दादा कोंडके येणार आहेत म्हणून ग्रामीण भागातून सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.धाराशिव,तुळजापूरची सभा आटोपून ते गेवराईला येणार होते .सभेला विलंब होत होता अन् पब्लिकची उत्कंठा शिगेला गेली होती.सूत्रसंचालन करणारा शांत राहा म्हणून सारखं आवाहन करत होता. तडाखेबंद भाषणासाठी मी लहानपणापासूनच शाळेत ओळखला जात होतो. आमच्या गावातल्या शिवसेना शाखाप्रमुखाने मलाच सभेत उभे केले व भाषण करायला सांगितले. मी थोडाही राजकीय विचारधारेचा नव्हतो पण केवळ भाषण कला व बोलण्याची संधी घेत मी बालवयात ताडताड तब्बल चाळीस मिनिटे बोलत कॉंग्रेसचे वाभाडे काढले होते.


या भाषणामुळे कारण नसताना मला कट्टर बाल शिवसैनिक म्हणून तातुकाभर मान्यता मिळाली व पुढील वर्षी त्याचा परिणाम असा झाला की माझं प्राथमिक शिक्षण जि.प. शाळेतून संपल्यावर गावातली काँग्रेस पाईक माध्यमिक शाळा मला आठवीत प्रवेशच देईना.कसातरी प्रवेश झाला पण मलाच शाळेत करमेना झाले.मी स्वतःहून शाळेपासून दूर गेलो.पुढे जगदाळे सर आमच्या शाळेत आले व त्यांच्या प्रेमाखातर मी शाळेत आलो.माझं राजकीय वेडही त्यांनीच दूर केले.आज रोजीच्या यशासाठी त्यांना थँक यु म्हटल्याशिवाय पुढे जाता येत नाही.
जगदाळे सर म्हणजे एक कर्मयोगी गुरूजी आहेत.

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

मुख्याध्यापक स्व.गोविंदराव शेळके सर

जयभवानी शिक्षण संस्थेतील पहिले मुख्याध्यापक म्हणजे गोविंदराव शेळके सर. पंधरा दिवसापूर्वीच त्यांचे वयाच्या 79 व्या निधन झाले आहे. ते आमच्या यमादेवी विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक व काही काळ माझे आठवीचे मराठी शिक्षक. त्यांनी अनेक लेखक कवींना जवळून पाहिलेले होते. ते सतत प्रेरणादायी गोष्टी सांगत असत.माझं सेना समर्थक भाषण त्यांच्या कानावर गेलेलं होतंच ,ते मला नेहमी म्हणायचे शरद पवार खूप मोठे नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नाकात काड्या घालण्याचे तुझे वय नाही. राजकारण चांगले नसते. शाळेतील सर्व कार्यक्रमात त्यांनी दिलेली अध्ययनक्षीय भाषणे म्हणजे आमच्या साठी अनमोल शिदोरी आहे. सर आज हयात नसले तरी त्यांची शिकवण सोबत आहे.

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

महाविद्यालयीन शिक्षण
श्री.प्रा.आनंद बडवे सर

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024


जयभवानी महाविद्यालय गढीचे माझे फिजिक्सचे टिचर म्हणजे बडवे सर.ऋषी वाणीतून विज्ञान ऐकायचं असेल तर बडवे सरांचा विद्यार्थी व्हावं.वक्तशीरपणा , सत्य, निष्ठा,तत्वपालन मुल्यांचे दृश्य उदाहरण बडवे सर सोडून दुसरं अभावानेच पाहायला मिळणार.शालेय जीवनाच्या बंदिस्त बडग्यातून मोकळ्या वातावरणातलं पहिलं पाऊल म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय.खऱ्या जिंदगीच्या विमानाचा टेक आॕफ येथूनच होतो म्हणूनच जिथं उड्डाण असतं तिथंच भरकटणंही वाट्याला येऊ शकतं.बडवे सर आम्हाला शाळेतले संस्कार विसरूच देत नव्हते.

व्यावसायिक शिक्षण

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024


श्रीमती प्रा.कुसुम मिस्त्री व स्व.अरूणावती कावळे मॅडम
जनता अध्यापक विद्यालय चंद्रपूरच्या माझ्या अध्यापिका मिस्त्री मॕडम व कावळे मॅडम माझ्यासाठी आई होत्या म्हणूनच घरापासून पाचशे किमी दूर असूनही मी घरीच होतो.त्यांच्या घरात सहज वावर व स्वयंपाक घरातलं हवं ते खाणं .हा जणू पुरावाच होता की त्या माझ्या आईच आहेत.


शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

प्राचार्य वीरसेन जीवने सर


स्वाभिमानाची, संघर्षाची शिकवण जीवने सरांनी दिली.मराठी, हिंदी,इंग्रजी तीनही भाषा सूत्रात एकसंघ केलेली त्यांची भाषणे म्हणजे आयुष्य शिदोरीची पुंजीच. सर आज रोजी सर ऐंशीच्या घरात आहेत. कालच कॉल केला होता. ठणठणीत आवाज ,कुशाग्र बुद्धीची चुणुक आजही तशीच आहे.

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024

नामोल्लेख करायचे राहून गेलेले अनेक गुरूजी मला खूप प्रिय आहेत.

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक श्री‌जाधव सर


विज्ञानातील सर्व संबोध ,कार्यकारणभाव शिकविणारे विज्ञानचे जगन्नाथ जोशी सर,गणिताच्या जंगलातून सुरक्षित व सराईत सफर घडवून आणणारे गडम सर,शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले देशमुख सर,मधुकर ढाकणे सर.सतत आत्मविश्वास देणारे यमादेवी विद्यालयाचे पहिले शिक्षक रघुनाथ जाधव सर‌.ते माझे इतिहासाचे व क्रीडा शिक्षक.दहावीत असताना सर मला सारखं म्हणायचे, इतिहास भूगोलात पैकीच्या पैकी मार्क पडले पाहिजेत बरं. अन् खरंच मला इतिहासात साठपैकी साठ व भूगोलला चाळीसपैकी सदतीस गुण मिळाले. अस्सखलित इंग्रजी शिकविणारे कांबळे सर,खाजेकर सर, चित्रकला शिकविणारे घुम्बार्डे सर ,चलता चलता इंग्रजी शिकविणारे चंद्रकांत चव्हाण सर,शहरे सर,बोराडे सर ,उच्च शिक्षण घेताना लाभलेले जयनारायण रेगुडे सर,प्राचार्य निळकंठ वडजे सर,माधव चव्हाण सर,कावेरी डहाळे मॅडम …….


हत्तीचं पाऊल होऊन ज्यांनी माझ्या मनात खोलवर पाऊलखुण उमटविली असे कितीतरी गुरूजन आहेत.

 शिकायचं म्हणून शिकायचं असेल तर शिक्षण कुठेही घेता येते पण चिरकाल स्मरणातलं अध्ययन अध्यापन हवं असेल तर उपरोक्त उल्लेख केलेल्या  शिक्षकांच्या तोडीचे गुरूजी मिळायला हवेत.मला असे अलौकिक गुरूजन लाभले म्हणूनच माझी गुरूजी म्हणून  पायवाट सोपी झाली.गेली चोवीस वर्षे मी गुरूजी नावाच्या पायवाटेवरून चालत आहे.माझ्या गुरूजनांनी दाखविलेली पाऊलवाट बेधडक चालतो आहे.

शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024 शिक्षक दिनानिमित्त थँक यू टीचर.मी भाग्यवान आहे कारण मी उपरोक्त गुरूजनांचा विद्यार्थी आहे.
शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .

कचरू चांभारे
मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा मन्यारवाडी ता.जि.बीड 9421384434
chambhareks79@gmail.com

20 thoughts on “शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024”

  1. खूप छान लेखन सर तुमचा लेख वाचून आम्हाला आमचे गुरुजी आठवले शाळेचे दिवस आठवले

    Reply
  2. खूप छान लेखन तुमचा लेख वाचून आम्हाला आमच्या शाळेतील दिवस आठवले व सर्व गुरुजन आठवले

    Reply
  3. आता पर्यंत चे सर्व शिक्षक त्याच्या वागणुकीसह आठवणीत आहेत तुमच्या, हेच आज शिक्षक दिनानिमित्त श्रध्दासुमने आहेत तुमची, आमचे ही बालपणापासून चे बरेच शिक्षक आठवले, त्याबद्द्ल धन्यवाद. छान लिहल आहे

    Reply
  4. आठवणीतले शिक्षकांचे‌ अविस्मरणीय अनुभव वाचून मला ही माझ्या काही शिक्षकांची प्रतिमा डोळ्यासमोर आली. खूप छान शिक्षकांप्रती आदरांजली व्यक्त केली.

    Reply
  5. खूप सुंदर वर्णन केलंय कचरू भाऊ..
    आपले आयुष्य घडविणाऱ्या शिक्षकांबद्दल आपण व्यक्त केलेले कृतज्ञतापूर्वक लेखन वाचून खूप हायसे वाटले…
    Happy Teachers Day

    Reply

Leave a Comment