श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024

श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024
तो आधी बंधु आहे,सखा आहे ,मार्गदाता आहे अन् मग नंतर देव आहे.त्याचीच तर आज जयंती आहे. काळोखात,अंधारकोठडीत तो जन्माला आला पण त्यानेच प्रकाश दाखवला ,अंधार दूर केला. होय तोच तो श्रीकृष्ण सखा.
श्रीकृष्णास लिहिलेले पत्र वाचा व व्यक्त व्हा.

श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024

 hi dear God श्रीकृष्णा 
    सा.दंडवत.

आज तुझा वाढदिवस.शरीर देहाने अस्तित्वात नसलेल्या ऐतिहासिक व पौराणिक महामानवांची जयंती साजरी करण्याची आम्हा मर्त्यांची रीत आहे.पण तरीही मी तुझ्या जन्मदिनाला वाढदिवसच म्हणतो कारण तू माझ्या भोवतालीच आहेस ; हा माझा कैक वर्षाचा  भास नव्हे  आत्मविश्वास आहे.आधी तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा .

श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024

hi dear म्हणून तुला हाक मारण्याचं कारण म्हणजे , हा शब्द आमच्याकडे सर्व भाषिक लोकांसोबतच सर्व वयोगटालाही पटकन कळतो.मीरेच्या भाषेत तुझ्याशी भक्तीभावाने बोलायचं होतं पण तिच तर एकदा म्हणाली होती की साधी भोळी मीरा तुला कळली नाही. भक्तीभावाने वेडी झालेल्या मीरेची ही कथा तर माझ्यासारख्यांची काय कथा ? म्हणून म्हणलं hi dear म्हणावं.


देवा ,तुझ्यावरील निस्सिम प्रेमापोटी तुझ्याशी बोलतो आहे.अन् महत्वाचं म्हणजे या भूतलावर पुन्हा जन्म घे.हे सांगण्यासाठी हा पत्रप्रपंच करत आहे.

श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024


मला तुझी चार रूपे फार आवडतात.तुझ्या या चार रूपावरच तुझ्यावरील श्रद्धेची सिद्धता आहे. तुझ्या या चारही रूपाची म्हणण्यापेक्षा अवतारकार्याची आमच्यासाठी फार गरज आहे,हे ही तुला आज आवर्जून सांगायचे आहे.
मला आवडलेलं तुझं सर्वाधिक सुंदर रूप म्हणजे कुरूक्षेत्रावरील अर्जूनाला सांगितलेला गीतोपदेश होय.आपल्याच नात्यातील लोकांवर शस्त्र चालवायचं ही कल्पना अर्जूनाला सुसंगत वाटत नव्हती.हे कृत्य धर्मसंमत नसलं तरी ,राजधर्म संमत होतं.गोंधळलेल्या अर्जूनाच्या गळी तू बरोबर राजधर्म उतरविलास अन् अर्जून लढायला तयार झाला.अर्जूनासोबत महाभारत संपलं असं फक्त पुराणात ठीक आहे. पण वास्तवात आज प्रत्येक नर देह अर्जून आहे अन् कित्येक प्रसंग कुरूक्षेत्र आहेत.रोजच आम्ही अर्जून असतो.गोंधळलेले, वेंधळलेले पूर्ण गलितगात्र झालेले.अशावेळी आठवतो फक्त तूच.


श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024

तुझं मला आवडणारं दुसरं रूप म्हणजे सुदामा भेट .मैत्री पर्वात या भेटीला तोडच नाही.गरीबाघरचे पोहे खाऊन त्याची नगरीच सोन्याची करण्याची तुझी कृती ,आजच्या भाषेत सॉलिड ग्रेटच. गुरूगृही एकत्र शिकताना जुळलेली मैत्री तुझ्यासारखी कोणीच निभावली नाही.अंधारलेल्या अडचणीत दिवा धरण्याची ताकद खरंच मित्राशिवाय कुणातच नाही.पण काय झालंय देवा , आपण अडचणीत असलो की त्याचवेळी मित्रही चाचपडणारी जिंदगी जगत आहेत.त्यामुळे तू जसं मित्राला अडचणीतून बाहेर काढलंस ना , तसं आता कुणाला जमत नाही.आमचे व्यवहार आता परतीच्या करारावर ठरतात. गुड मॉर्निंग व गुड नाईटचे मेसेज तू कधीच वाचत जाऊ नकोस.त्या मेसेजमुळे तुला उगीच वाटायचं की परिस्थिती रामराज्यावानी आहे.अजूनही रामराज्य नाही आलं. आजही खूप लोकं अडचणीत आहेत.अशात जर मदतीला आलास तर खूप बरे होईल.जवळच्यांनी पाठ फिरवली आहे.जवळचे मित्र फक्त दुःखआवेगाने भावपूर्ण श्रदांजली लिहिण्यापुरते उरले आहेत .पण ज्याच्यासाठी लिहिलंय तोच नेमका वाचण्यासाठी इथं नसतो.आमच्या फिल्म इंडस्ट्रीत दोस्त,दोस्तान्यावर अनेक सिनेमे आले.लाखो गाणे लिहिले पण मैत्रीच्या नात्याला डाग लावणाऱ्या घटना घडतच आहेत.

श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024

मला आवडलेलं तुझं तिसरं रूप म्हणजे भरदरबारी द्रौपदीचे वस्त्रहरण होताना तुझं धावून येणं.आप्तगण व एकमुखी पाच नवरे तेथे बसलेले असताना कुणीही तिची विटंबना थांबवत नव्हतं.त्याचवेळी बंधू म्हणून तूच धाऊन आलास.आजही द्रौपदी रोज कुठेतरी तसाच अनुभव घेतेय ,पण देवा श्रीकृष्णा तुझी धाव कमी पडल्यामुळे कौरवसभेत जे पुढचं घडलं नव्हतं ते इथं नित्य नियमाने फक्त द्रौपदीचे नाव बदलून कितीदातरी घडतंय. श्रीकृष्णा तू यायला हवंस.तुझी खूप गरज आहे.

मला आवडलेलं तुझं चौथं रूप म्हणजे तुलाच अधिक प्रिय असलेलं आहे ,ते म्हणजे राधेच्या संगतीतलं.अल्लड भावात जीवन संगीत निर्माण करणारा श्रीकृष्ण आजही प्रत्येकाला खूप भावतो.प्रीती हा सहजभाव आहे.
मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तूच द्यायची आहेत.म्हणून तर हे मांडलंय सगळं.
माझा पहिला प्रश्न थेट तुलाच.

श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024

श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024

  1. अर्जूनाला आत्मनिर्भर केलंस ,सुदामाला श्रीमंत केलंस ,द्रौपदीला वाचवलंस ,राधेला जीवापाड जपलंस …
    मग तरीही वाईट घटनेला कृष्णकृत्य का म्हणतात ?
  2. रामही तुझाच अवतार आहे .सीतेच्या केसालाही धक्का न लावणारा रावण युगानुयुगे का जाळला जातोय ? अन् आज पुरूषी दांभिकतेचे वस्त्र पांघरून नाव बदलून इथला रावण सीतेला का बाटवतोय ?
    3.आटत चाललेल्या मैत्री भावनेचे पुनरूज्जीवन करण्यासाठी यायचे नाही का तुला ?
    4.प्रीतीबाबतीत राधाकृष्ण हे नातं अद्वैत आहे.आम्ही या नावाचा गोडवा गाताना थकत नाही.पण वास्तवात प्रेम करणारांच्या नशिबी रक्ताचे पाट का?

  3. प्रिय देवा ,ये गड्या एकदा .hi dear तुझ्या येण्याच्या होकारातच वाढदिवसाच्या शुभेच्छा दडलेल्या आहेत.त्या शुभेच्छा वांझोट्या होऊ द्यायच्या नसतील तर तुला यावच लागेल.मदत तू कर ,मी तुला वंचित अर्जून ,सुदामा ,द्रौपदी ,राधा दाखवतो.

  4. hi dear मी तुझी वाट पाहतोय बरं.
  5. श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024

  6. कचरू चांभारे
    मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा मन्यारवाडी
    ता.जि.बीड 9421384434
    chambhareks79@gmail.com
श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024
श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024

श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024

10 thoughts on “श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024”

  1. खूप छान सरजी खरंच श्रीकृष्ण जन्माष्टमी चा हा लेख वाचून मनात आले की आज कृष्णा जगाला गरज आहे.
    जय श्रीकृष्ण
    दंडवत

    Reply
  2. कृष्णाला लिहलेले पत्र खरंच खूप वास्तववादी आहे.अप्रतिम लेखन
    जय श्री कृष्णा

    Reply

Leave a Comment