जागतिक हास्य दिन विशेष
हास्य हा जगण्याचा मंत्र भारी जोपासना करा आता तरी
मे महिन्याचा पहिला रविवार जागतिक हास्य दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो.हास्य नैसर्गिक व उपजत देणगी असली तरी जगाला हास्य दिन देण्याचे श्रेय मुंबईकर भारतीय डॉ.मदन कटारिया यांना जाते.त्यांच्या हास्य योग चळवळीतून ही कल्पना पुढे आली व 1998 पासून जगभरात मान्य झाली.जिवंत राहण्यासाठी आवश्यक ती धडपड करण्याची शक्ती प्रत्येक सजीवास नैसर्गिकरित्याच लाभलेली आहे.तो जगण्याचा स्थायीभाव आहे.भूक ,भय,तृप्ती या सजीवाच्या प्राथमिक भावना आहेत.सजीव सृष्टीमध्ये मानव हा प्रचंड संकरित प्राणी आहे.
बुद्धीवादाच्या काही पैलूंनी संशोधनाचे नवीन आयाम मांडले व मानवी जीवनात आमुलाग्र बदल झाला.इतर प्राणी व मानव यांची तुलना केली तर अनेक वैशिष्ट्यपूर्ण देणाग्यांमुळे मानव इतरांपेक्षा खूप वेगळा ठरला आहे.हास्य ही अशीच एक मानवाला लाभलेली अप्रतिम देणगी आहे.सूक्ष्मपणे विचार केला तर हास्य ही स्वतंत्र भावना नाही ,तर हास्य हे आनंदाचे ,समाधानाचे प्रगटीकरण आहे.हसणं , नाचणं ,रडणं हे तीनही भावाविष्कार मानवासाठी अप्रतिम गॉडगिफ्ट दैवी देणगी आहे.पण लाज नावाची आणखी एक भावना मानवास मिळालेली आहे.ही लाज नेहमीच हसणं ,रडणं व नाचणं यांचा कोंडमारा करत आली आहे.वाढत्या वयाप्रमाणे माणसाची सामाजिक समज अधिक प्रगल्भ होत जाते ,अन् माणुस वरील तीनही प्रकारच्या भावना प्रगटीकरणाला स्वतःच लगाम घालतो.
हसणं ही नैसर्गिक भावना आहे.ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो आनंदी ,उत्साही अन् प्रेमळही असतो.आनंद शोधणं ही एक कला आहे.ज्याला आनंद शोधता येतो,हास्य त्याची आनंदाने गुलामी करतं.कशातही आनंद शोधणारास हास्याचे झरे सापडतात.ज्याला हास्य सापडतं ,ती व्यक्ती प्रभावशाली असते.हास्य हा आपला अविभाज्य घटक असला तरी ज्याने हा घटक अधिक विकसित केला आहे त्यालाच त्याचा मनमुराद आनंद घेता येतो.आज गतिमान आयुष्यात निवांतपणा हरवून गेला आहे
.मानवी सहजीवनाची सहजता गुंतागुंतीची झाली आहे.ताणतणाव व दगदग या जुळ्या बहिणीसोबत मैत्री करून माणूस आपला सूर्योदय-सूर्यास्त मोजत आहे.हास्य ही फक्त भावनाच आहे असे नाही तर ते एक प्रभावी औषध आहे.दहा मिनिटाच्या व्यायामाने हृदयाचा जेवढा व्यायाम होतो,तेवढाच व्यायाम एक मिनिटाच्या प्रसन्न हसण्याने होतो.हसल्यामुळे शरीरात सेटोटेटीन हे आनंदाचे हार्मोन्स तयार होतात.त्यामुळे भूक कमी लागते.तुला पाहून मन भरलं .असं जे आपण व्यवहारात बोलतो ना त्याचं मूळ इथं आहे.हसण्यामुळे एंडोर्फिस हे हार्मोन्स सुद्धा निर्माण होते.या हार्मोन्समुळे मनात फील गुडची भावना तयार होते.त्यामुळे दुःखावर हलकी फुंकर राज्य करते.
हास्याचेही अनेक प्रकार पडतात.स्मित हास्य हे सर्वश्रेष्ठ हास्य आहे.जिथं ओळख आहे ,तिथेच ते निर्माण होते.ओळखीच्या व्यक्तीच्या नजरानजरीची ओळख पटली की हृदय त्या ओळखीचा पुरावा स्वीकारते व चेहऱ्यावर मंद प्रसन्न स्मित झळकते.स्मित हास्यात चेहऱ्यावरचे स्नायू फार प्रसरण पावत नसले तरी अंतरीच्या खोलातून आलेली प्रसन्नता संपूर्ण चेहऱ्यावर पसरते.हास्य हा कबुली जबाबाचा करारनामा म्हणून सुद्धा काम करतो.एखाद्याची गोष्ट पटली तर हसून दाद दिल्यास ,दोन्ही पक्ष खूश होतात.गडगडाटी हास्य हा हास्याचा प्रकार सगळ्यांचच लक्ष वेधून घेतो पण पाहणारांची नाराजी झाल्यास ,हसणाराच्या मनात अपराधीभाव येतो.हसून काय पाप केलं ? याच्या उत्तरात तो गुंतून जातो.विनोदाला दाद हे ही हास्याचे एक रूप आहे.हास्याचे सगळेच प्रकार आनंद व्यक्त करणारे असतात.पण याला अपवाद आहे तो कुत्सित किंवा छद्मी हास्याचा.हास्याच्या प्रकारात कुत्सित हास्य हा अतिशय निकृष्ट प्रकार आहे.एकवेळ हास्य थांबलं तरी चालेल ,पण कुत्सित हास्याचा उगम कोठेच होऊ नये.हास्य ही माणसाला मिळालेली देणगी असली तरी आज आपल्यावर हास्य क्लब निर्माण करण्याची वेळ आली आहे.ही घटना म्हणजे नैसर्गिकतेचा अभाव अन् कृत्रिमतेचा प्रभाव सांगणारी आहे.
हास्य हे एक जादूई रसायन आहे.माधुरी दिक्षित नेणे झाली.हळूहळू पन्नाशीपार गेली तरी तिचं हसणं फिल्म इंडस्ट्रीतलं भूरळ आहे.पुढे हाच हास्य वारसा मुक्ता बर्वे ,अमृता खानविलकर या मराठी तारकांनी जपला आहे.हसताना गालावर पडली ,की ती खळी कितीतरी जणांसाठी खदानच ठरते.लहान मुलांचं हसणं अतिशय लोभस अन् गोंडस.हसरं मूल दिसलं की त्याला उचलून घेण्याचा मोह आवरतच नाही.हसताना उघडलेल्या मुखात,सरळ दिसणारी दंतपंक्ती ,केसांची हालचाल हास्याचे सौंदर्य अधिकच खुलविते.हसण्याचं ठिकाण बदललं की त्याप्रमाणे भावही बदलत जातात.लहानमुलांसोबतच्या हास्यात दुःख विरघळविण्याची क्षमता असते.आई वडीलांसोबत हसताना विश्वास वाढतो.बायकोसोबत हसताना अनेक संमिश्र भावाच्या छटा असतात.कारण ती जबाबदार आयुष्याची भागीदार असते.ही जबाबदारी समर्थपणे पेलताना प्रतिपूर्तीचे अनेक क्षण हास्य जन्माला घालतात.मित्रा मित्रातले हास्याचे फवारे मानवी जगतापासून दूर गेलेल्या दुनियेतले असतात.तिथे फक्त मैत्री हीच दुनियादारी असते.प्रिय व्यक्तीच्या हसण्याचा आवाज ऐकण्याची आतुरता व त्याचं नेहमीचं चिरपरिचित हसणं ऐकून होणारी तृप्तता ; हे हास्य मात्र अवर्णनीय तृप्ती देणारं असतं.त्या हास्यासाठी दोन्ही मने सारखीच वेडावलेली असतात.
विनोदी कविता,कथा,लेख, चित्रपट,मालिका,पुस्तके यांची विपुलताच माणसाच्या आयुष्यातील हास्याला अधोरेखित करते.विनोदी लेखक,विनोदी अभिनेता अशी जन्मभर ओळख जपलेले अनेक लोक आपल्याला दिसून येतात.चार्ली चाप्लीन,दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ,मकरंद अनासपुरे यांना गंभीर भूमिकेत पाहणं पचनी पडत नाही याचं कारण त्यांना आपण स्वीकारलेल्या हास्य भूमिकेत दडलेलं आहे.अलिकडील काळात प्रसाद खांडेकर,प्रभाकर मोरे,गौरव मोरे,पृथ्वीक, समीर चौगुले-राऊत-माने,नम्रता,ईशा,चेतना,रसिका,प्रिया,शिवाली यांनी हास्यजत्रेतून महाराष्ट्राला हसतं ठेवलं आहे.तेच तिकडे हिंदीत तारका मेहता का उलटा चष्मा मध्ये दयाभाभी-जेठालाल ,तारक-अंजली,कोमल-डॉ.हाथी,बबिता-अय्यर,माधवी-भिडे गुरूजी ,चंपकलाल,एकटा जीव पोपटलाल व टपू सेना या पात्रांनी रसिकांची दाद मिळवलेली आहे.
जात धर्म लिंग वर्ण भेदत मानवी मनास एकत्र करण्याची ताकद हास्यात आहे.बोलकं राहिलं की माणुस हसतं होतं.किंवा हसतं राहिलं की माणुस बोलतं होतं.यांमुळे कॅलरीज खर्च होऊन वजन नियंत्रणात राहते. न बोलता फुगुन राहणारी माणसं मनाने व शरीरानेही फुगलेलीच राहतात व अशी माणसं चारचौघांत बेदखल होतात.
मानवानं हास्य देणगीचं मोल समजून घ्यायलाच हवं.हसरी व्यक्ती नेहमीच त्याच्या उपस्थितीची दखल घ्यायला लावत असते.नव्हे नव्हे ,अशा व्यक्तीची दखल घेणं इतरांनाच खूप आवडत असतं.हसा आणि हसवा हा मार्ग दीर्घायुषी रस्त्याला समांतरपणे धावत असतो.म्हणून हसा ,हसत राहा,हसवत राहा.
जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .
लेखात वापरलेले फोटो इंटरनेट माहिती जाल वरून घेतले आहेत.
लेखन– कचरू चांभारे मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा मन्यारवाडी ता.जि.बीड 9421384434
kacharuchambhare@gmail.comमे महिन्याचा पहिला रविवार जागतिक हास्य दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो.हास्य नैसर्गिक व उपजत देणगी असली तरी जगाला हास्य दिन देण्याचे श्रेय मुंबईकर भारतीय डॉ.मदन कटारिया यांना जाते.त्यांच्या हास्य योग चळवळीतून ही कल्पना पुढे आली व 1998 पासून जगभरात मान्य झाली.जिवंत राहण्यासाठी आवश्यक ती धडपड करण्याची शक्ती प्रत्येक सजीवास नैसर्गिकरित्याच लाभलेली आहे.तो जगण्याचा स्थायीभाव आहे.भूक ,भय,तृप्ती या सजीवाच्या प्राथमिक भावना आहेत.सजीव सृष्टीमध्ये मानव हा प्रचंड संकरित प्राणी आहे.बुद्धीवादाच्या काही पैलूंनी संशोधनाचे नवीन आयाम मांडले व मानवी जीवनात आमुलाग्र बदल झाला.इतर प्राणी व मानव यांची तुलना केली तर अनेक वैशिष्ट्यपूर्ण देणाग्यांमुळे मानव इतरांपेक्षा खूप वेगळा ठरला आहे.हास्य ही अशीच एक मानवाला लाभलेली अप्रतिम देणगी आहे.सूक्ष्मपणे विचार केला तर हास्य ही स्वतंत्र भावना नाही ,तर हास्य हे आनंदाचे ,समाधानाचे प्रगटीकरण आहे.हसणं , नाचणं ,रडणं हे तीनही भावाविष्कार मानवासाठी अप्रतिम गॉडगिफ्ट दैवी देणगी आहे.पण लाज नावाची आणखी एक भावना मानवास मिळालेली आहे.ही लाज नेहमीच हसणं ,रडणं व नाचणं यांचा कोंडमारा करत आली आहे.वाढत्या वयाप्रमाणे माणसाची सामाजिक समज अधिक प्रगल्भ होत जाते ,अन् माणुस वरील तीनही प्रकारच्या भावना प्रगटीकरणाला स्वतःच लगाम घालतो.
हसणं ही नैसर्गिक भावना आहे.ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो आनंदी ,उत्साही अन् प्रेमळही असतो.आनंद शोधणं ही एक कला आहे.ज्याला आनंद शोधता येतो,हास्य त्याची आनंदाने गुलामी करतं.कशातही आनंद शोधणारास हास्याचे झरे सापडतात.ज्याला हास्य सापडतं ,ती व्यक्ती प्रभावशाली असते.हास्य हा आपला अविभाज्य घटक असला तरी ज्याने हा घटक अधिक विकसित केला आहे त्यालाच त्याचा मनमुराद आनंद घेता येतो.आज गतिमान आयुष्यात निवांतपणा हरवून गेला आहे.मानवी सहजीवनाची सहजता गुंतागुंतीची झाली आहे.ताणतणाव व दगदग या जुळ्या बहिणीसोबत मैत्री करून माणूस आपला सूर्योदय-सूर्यास्त मोजत आहे.हास्य ही फक्त भावनाच आहे असे नाही तर ते एक प्रभावी औषध आहे.दहा मिनिटाच्या व्यायामाने हृदयाचा जेवढा व्यायाम होतो,तेवढाच व्यायाम एक मिनिटाच्या प्रसन्न हसण्याने होतो.हसल्यामुळे शरीरात सेटोटेटीन हे आनंदाचे हार्मोन्स तयार होतात.त्यामुळे भूक कमी लागते.तुला पाहून मन भरलं .असं जे आपण व्यवहारात बोलतो ना त्याचं मूळ इथं आहे.हसण्यामुळे एंडोर्फिस हे हार्मोन्स सुद्धा निर्माण होते.या हार्मोन्समुळे मनात फील गुडची भावना तयार होते.त्यामुळे दुःखावर हलकी फुंकर राज्य करते.हास्याचेही अनेक प्रकार पडतात.स्मित हास्य हे सर्वश्रेष्ठ हास्य आहे.जिथं ओळख आहे ,तिथेच ते निर्माण होते.ओळखीच्या व्यक्तीच्या नजरानजरीची ओळख पटली की हृदय त्या ओळखीचा पुरावा स्वीकारते व चेहऱ्यावर मंद प्रसन्न स्मित झळकते.स्मित हास्यात चेहऱ्यावरचे स्नायू फार प्रसरण पावत नसले तरी अंतरीच्या खोलातून आलेली प्रसन्नता संपूर्ण चेहऱ्यावर पसरते.हास्य हा कबुली जबाबाचा करारनामा म्हणून सुद्धा काम करतो.एखाद्याची गोष्ट पटली तर हसून दाद दिल्यास ,दोन्ही पक्ष खूश होतात.गडगडाटी हास्य हा हास्याचा प्रकार सगळ्यांचच लक्ष वेधून घेतो पण पाहणारांची नाराजी झाल्यास ,हसणाराच्या मनात अपराधीभाव येतो.हसून काय पाप केलं ? याच्या उत्तरात तो गुंतून जातो.विनोदाला दाद हे ही हास्याचे एक रूप आहे.हास्याचे सगळेच प्रकार आनंद व्यक्त करणारे असतात.पण याला अपवाद आहे तो कुत्सित किंवा छद्मी हास्याचा.हास्याच्या प्रकारात कुत्सित हास्य हा अतिशय निकृष्ट प्रकार आहे.एकवेळ हास्य थांबलं तरी चालेल ,पण कुत्सित हास्याचा उगम कोठेच होऊ नये.हास्य ही माणसाला मिळालेली देणगी असली तरी आज आपल्यावर हास्य क्लब निर्माण करण्याची वेळ आली आहे.ही घटना म्हणजे नैसर्गिकतेचा अभाव अन् कृत्रिमतेचा प्रभाव सांगणारी आहे.
हास्य हे एक जादूई रसायन आहे.माधुरी दिक्षित नेणे झाली.हळूहळू पन्नाशीपार गेली तरी तिचं हसणं फिल्म इंडस्ट्रीतलं भूरळ आहे.पुढे हाच हास्य वारसा मुक्ता बर्वे ,अमृता खानविलकर या मराठी तारकांनी जपला आहे.हसताना गालावर पडली ,की ती खळी कितीतरी जणांसाठी खदानच ठरते.लहान मुलांचं हसणं अतिशय लोभस अन् गोंडस.हसरं मूल दिसलं की त्याला उचलून घेण्याचा मोह आवरतच नाही.हसताना उघडलेल्या मुखात,सरळ दिसणारी दंतपंक्ती ,केसांची हालचाल हास्याचे सौंदर्य अधिकच खुलविते.हसण्याचं ठिकाण बदललं की त्याप्रमाणे भावही बदलत जातात.लहानमुलांसोबतच्या हास्यात दुःख विरघळविण्याची क्षमता असते.आई वडीलांसोबत हसताना विश्वास वाढतो.बायकोसोबत हसताना अनेक संमिश्र भावाच्या छटा असतात.कारण ती जबाबदार आयुष्याची भागीदार असते.ही जबाबदारी समर्थपणे पेलताना प्रतिपूर्तीचे अनेक क्षण हास्य जन्माला घालतात.मित्रा मित्रातले हास्याचे फवारे मानवी जगतापासून दूर गेलेल्या दुनियेतले असतात.तिथे फक्त मैत्री हीच दुनियादारी असते.प्रिय व्यक्तीच्या हसण्याचा आवाज ऐकण्याची आतुरता व त्याचं नेहमीचं चिरपरिचित हसणं ऐकून होणारी तृप्तता ; हे हास्य मात्र अवर्णनीय तृप्ती देणारं असतं.त्या हास्यासाठी दोन्ही मने सारखीच वेडावलेली असतात.
विनोदी कविता,कथा,लेख, चित्रपट,मालिका,पुस्तके यांची विपुलताच माणसाच्या आयुष्यातील हास्याला अधोरेखित करते.विनोदी लेखक,विनोदी अभिनेता अशी जन्मभर ओळख जपलेले अनेक लोक आपल्याला दिसून येतात.चार्ली चाप्लीन,दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ,मकरंद अनासपुरे यांना गंभीर भूमिकेत पाहणं पचनी पडत नाही याचं कारण त्यांना आपण स्वीकारलेल्या हास्य भूमिकेत दडलेलं आहे.अलिकडील काळात प्रसाद खांडेकर,प्रभाकर मोरे,गौरव मोरे,पृथ्वीक, समीर चौगुले-राऊत-माने,नम्रता,ईशा,चेतना,रसिका,प्रिया,शिवाली यांनी हास्यजत्रेतून महाराष्ट्राला हसतं ठेवलं आहे.तेच तिकडे हिंदीत तारका मेहता का उलटा चष्मा मध्ये दयाभाभी-जेठालाल ,तारक-अंजली,कोमल-डॉ.हाथी,बबिता-अय्यर,माधवी-भिडे गुरूजी ,चंपकलाल,एकटा जीव पोपटलाल व टपू सेना या पात्रांनी रसिकांची दाद मिळवलेली आहे.
जात धर्म लिंग वर्ण भेदत मानवी मनास एकत्र करण्याची ताकद हास्यात आहे.बोलकं राहिलं की माणुस हसतं होतं.किंवा हसतं राहिलं की माणुस बोलतं होतं.यांमुळे कॅलरीज खर्च होऊन वजन नियंत्रणात राहते. न बोलता फुगुन राहणारी माणसं मनाने व शरीरानेही फुगलेलीच राहतात व अशी माणसं चारचौघांत बेदखल होतात.
मानवानं हास्य देणगीचं मोल समजून घ्यायलाच हवं.हसरी व्यक्ती नेहमीच त्याच्या उपस्थितीची दखल घ्यायला लावत असते.नव्हे नव्हे ,अशा व्यक्तीची दखल घेणं इतरांनाच खूप आवडत असतं.हसा आणि हसवा हा मार्ग दीर्घायुषी रस्त्याला समांतरपणे धावत असतो.म्हणून हसा ,हसत राहा,हसवत राहा.
जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .
लेखात वापरलेले फोटो इंटरनेट माहिती जाल वरून घेतले आहेत.
लेखन– कचरू चांभारे मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा मन्यारवाडी ता.जि.बीड 9421384434
kacharuchambhare@gmail.com
Very nice Sir,be smile and be happy.
Thanks dear sir
खूप छान.👌👌
धन्यवाद सर
सुंदर अतिसुंदर कचरू दादा
धन्यवाद दादा
हास्याचा मंत्र नवीन ऊर्जा देणारा
धन्यवाद सर
खूपच छान लेख💐👍मनसोक्त हास्यांनंद फक्त मित्र मैत्रीणींसोबतच्या गप्पागोष्टी तच घेता येतो… जे आता जरा कमीच
धन्यवाद
छान छान….
जुही चावला, रेणुका शहाणे यांचे हसणे नाही आवडत वाटते तुम्हाला 😀
सर्व फोटो बसले नसते ना
तुम्ही रोजच आम्हा मित्रांना हसवत असता.त्यामूळे दिवसातून एकदा तरी भेट होते.
असेच लिहित रहा सर
धन्यवाद दोस्त दोस्त
हसतमुख मित्राला हस्से दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
लेख आवडला सर
Thanks dear दोस्त
Very nice writing on laughing 😄
You include all historical, mental and scientific points in it. Nice 👍
Be happy, healthy, energetic by laughing 😄
धन्यवाद सर
खूपच छान शब्दांकन
धन्यवाद ताईसाहेब
खूप छान लेख . हसण्याने आपले टेन्शन जाते हसा खेळा व तनावमुक्त राहा .
छान सर,भारी लिहले
👍👌🏼
अप्रतिम लेखन केले आहे सर जी
आपण केलेल्या लेखनातून दुखी राहणाऱ्या माणसांना आनंदी असण्याचे महत्त्व कळेल व त्याचे दुःख नाहीसे होण्यास व आनंदी जीवन जगण्यास मदत होईल. लेख खूप छान.
सर, तुमचे लेखन अभ्यासपूर्ण आणि आनंददायी असते.
धन्यवाद.
धन्यवाद मातोश्री
शब्दप्रभू आहेत सर आपण कोणताही विषय सुंदर रितीने मांडणी करता. आपल्या क्षेत्रात निष्पाप बालकांसोबत हा भरपूर आनंद मिळतो
मनःपूर्वक धन्यवाद
सुंदर लेखन 🙏
खुप छान लेखन
Thanks
खूप छान लेखन सर
धन्यवाद सर
Thanks dear sir
Creativ thought💐
Thanks dear sir
Thanks dear sir