थॅंक्स गिव्हिंग डे डिसेंबर 2024
कॅलेंडरचे पान पलटविताना धन्यवाद द्यायचेत तुम्हाला
थँक्स म्हणावंच वाटतं राव……
थॅंक्स गिव्हिंग डे डिसेंबर 2024
नोव्हेंबरचा चौथा गुरूवार थँक्स गिव्हिंग डे म्हणून अमेरिका,इंग्लड,कॅनडा इत्यादी राष्ट्रात साजरा करतात.जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या काळापासून सुरू झालेली ही परंपरा आजही तिथे पाळली जाते.
अमेरिका,कॅनडा देशात नोव्हेंबरमध्ये सुगीचे दिवस संपल्यानंतर साजरा करतात.सुगीचे दिवस हा शब्द शेतातील पीक काढणीसंदर्भातील अंतिम दिवसातील कामाच्या लगबगीसाठी वापरला जातो.शेतीतील कामात यांत्रिकी साधनांच्या आगमनापूर्वी सर्व कामे मानवी कष्ट व पशूधनाची मेहनत यांच्यावरच निर्भर होती.
पिकांची कापणी,मळणी,उफणणी इत्यादी कामे सर्व एकत्रित शेतकरी वर्गात चालत त्यामुळे शेतात सर्वत्र मनुष्यांचा सामुहिक राबता दिसे.सर्वांच्या हाताला काम असे.काळ्या आईने भरभरून दिलेले धनधान्य पुढ्यात असे.धान्याचे दाणे म्हणजे जणू मोत्याची रासच.अपार कष्ट करत,घाम रूजवून शेतातून अंतिम पीक घेणं म्हणजे अतिव समाधान. हे समाधान सामुहिकरित्या साजरं करण्यासाठी कॅनडा अमेरिकेत थॅंक्स गिव्हिंग डे चा जन्म झाला.हा उत्सव शेतीशी संबंधित आहे.शेतातील पीकांमुळे या महिन्यात हाती पैसा येतो व ख्रिसमसची खरेदी सुरू होते.
सुगीचे दिवस म्हणजे शेतातील सुबत्ता धनधान्याच्या रूपात,लक्ष्मीच्या रूपात घरात येणं व काही काळ शेतातील कामातून अवकाश मिळणं.नेमकं हा अवकाश साजरा करण्यासाठी थॅंक्स गिव्हिंग डे चा उगम झाला.या वेळी पाहुणे,आप्त,शेतकरी मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात.सर्वांसाठी टर्की कोंबडीचे जेवण बनवले जाते.
टर्की हा कोंबडीचाच एक प्रकार असून ही कोंबडी कॅनडाच्या जंगलात मुबलक आढळते.तिचेच पाळीव रूप तिकडे आढळते.आपल्याकडील कोंबडीपेक्षा टर्की कोंबडी आकाराने मोठी असते.पंधराव्या शतकात तुर्कस्तानी लोकांचे या कोंबडीच्या व्यापारावर अधिराज्य होते म्हणून तिचे तुर्की कोंबडी पुढे टर्की कोंबडी असे नाव पडले. अमेरिकेच्या एकूण मांसाहारात 42 %वाटा टर्कीचा आहे.थॅंक्स गिव्हिंग डे ला मात्र फक्त टर्कीचाच बोलबाला असतो.
थॅंक्स गिव्हिंग डे डिसेंबर 2024
थॅंक्स गिव्हिंग डे डिसेंबर 2024
आपला भारत देश कृषीप्रधान देश असून जगाची भौगोलिक हवामानविषयक बाब विचारात घेता,आपण मौसमी हवामानाच्या पट्ट्यात येतो.मौसमी हवामान प्रदेशातील देशात तीन ऋतू आढळतात .प्रत्येक ऋतूत वेगळे हवामान असते.पीकपद्धती ऋतूनुसार बदलते.त्यामुळे भारतातील सणांवरही शेतीचा व पीकपद्धतीचा प्रभाव दिसून येतो.नागपंचमी,पोळा हे खास कृषी उत्सव आहेत.
अमेरिकेतील थॅंक्स गिव्हिंग डे बाबत माहिती वाचत असताना ,सहज माझे लक्ष भिंतीवरील कॅलेंडरकडे गेले .अन् मनात विचार आला की,वर्षभर आपण नवा महिना सुरू झाला की पान पलटवितो ,जुन्या महिन्यास मागे टाकून नव्या महिन्यांतील तारखांसोबत धावतो.पण डिसेंबर संपल्यावर मात्र संपूर्ण कॅलेंडरच बदलून टाकावे लागते.भिंतीवरील कॅलेंडर मागे पडते पण मनाच्या कॅनव्हासवर भल्याबुऱ्या आठवणी कोरल्या जातात.
मनातल्या कोनाड्यात जागा असलेल्या मित्रांसाठी,आप्तासाठी,कुटुंबासाठी, जे जे आयुष्यात आले त्या सर्वांसाठी थॅंक्स म्हणायचे आहे म्हणून आजचे लेखन आहे.
थॅंक्स गिव्हिंग डे डिसेंबर 2024
थॅंक्स गिव्हिंग डे डिसेंबर 2024
थँक्स गिव्हिंग निमित्तानं मनुष्य जन्माला घातलं म्हणून प्रथमत: ईश्वराचे,नियंत्याचे व हे जगणं सुकर केलं म्हणून मित्र परिवाराचे ,गणगोताचे आभार मानायलाच हवेत.
जिवंत असताना प्रत्येक क्षणी निसर्गाचे आभार माना,निसर्गाला धन्यवाद द्या.मी स्वतः हे करतोय,म्हणून सांगतो.
तसं पाहू जाता गेल्या कैक वर्षापासून मी थँक्स गिव्हिंग वैयक्तिक पातळीवर रोजच पाळतो आहे.आजही मी सकाळी उठल्या बरोबर सृष्टीच्या नियमन कर्त्यास पहिले वंदन करतो कारण त्या नियंत्याने माझ्या आयुष्यात आजची सकाळ जोडलेली आहे.श्रद्धेय स्मरणानंतर मग मी माझ्या आयुष्यातील प्रभावशाली व्यक्ती ,मित्र परिवार ,गुरूजन ,कुटुंब या सर्वांचे स्मरण करतो.जग सोडून गेलेल्याप्रती आदरभाव व्यक्त करतो व भोवतालच्या परिवारासाठी दीर्घ ,समृद्ध आयुष्याची प्रार्थना चिंतितो.
सर्वात आधी निसर्गाचे आभार मानावेत.कारण जगण्यासाठी श्वास व श्वासासाठी हवा लागते.ही हवा निसर्गाने अतिशय मुबलक प्रमाणात व सर्वत्र निर्माण केली आहे.पृथ्वीवरचा कोणताही कोपरा हवेवाचून रिकामा नाही. हवे नंतर गरज असते ती पाण्याची.पृथ्वी हा जलग्रह असून महासागराच्या रूपात पृथ्वीजवळ खाऱ्या पाण्याचे आगार आहे पण तिने सजीवासाठी गोड ,पिण्यास योग्य पाणी राखून ठेवले आहे. अन्नासाठी प्राणी, वनसंपदा,धनधान्य महामूर आहे.निसर्गाचे आभार सदोदित असायलाच हवेत.
थॅंक्स गिव्हिंग डे डिसेंबर 2024
मित्र समुदाय मोठा असो वा छोटा ,सगळीच नावे रोज आठवत नसतात.पण अशी काही नावे असतात की त्यांच्या आठवणीशिवाय माझ्या दिवसाची सुरूवात होतच नाही.असं का बरं होत असेल ?
याचं उत्तर माझ्या स्वभावात नसून त्यांनी दाखविलेल्या औदार्यात आहे.वेळ ,वित्त ,विचार या तीन प्रकारांनी सहकार्य केलेल्या व्यक्तीस माणुस कधीच विसरत नसतो.त्यामुळेच मित्र परिवार ,गणगोत छोटं असो वा मोठं ,कुणाचीही आठवण येण्याचे तीन कारणे असतात.
पहिले कारण.. काही माणसांचे सहकार्य ,जिव्हाळा,बोलणं,आधार देणं इतकं गोड असतं की ,ती माणसं स्मृतीपटलावरून आजूबाजूला जातच नसतात.ती माणसं सातत्याने पापणीवरच असतात. या वर्गवारीत हवेहवेसे असलेले सर्वजण येतात. हतबलतेच्या क्षणाला धावून आलेलं सर्वजण क्षणात आठवतात कारण त्यांच्या हातभाराने सर्व भार हलका केलेला असतो.या आठवणी कायम उभारी देणाऱ्या असतात.
थॅंक्स गिव्हिंग डे डिसेंबर 2024
दुसरे कारण… परिस्थिती वा प्रसंगानुरूप आठवण…
या आठवणी स्थळ काळ वेळ यांच्याशी सांगड घालून येतात.उदा.तुम्ही रायगडाला गेलात ,तर मनात लगेच यापूर्वी रायगडला गेल्याचे सगळे संदर्भ आठतात.किंवा तुम्ही तुमचा दहावी बारावीचा मार्कमेमो हातात घेतला ,अशावेळी शालेय गोष्टी अपसूक आठवतात.परसबागेत काम करत आहात ,यापूर्वीचे सगळे कष्ट आठवेल. वाढदिवस, नोकरी, समारंभ ,प्रवास या शब्दांसोबत अनेक घटका मनात फेर धरून नाचतात. समोरून एखादी व्यक्ती गेल्यास ओळखीच्या अनुषंगाने मनात जुनी फाईल ओपन होते,स्मरणिका फिल्म सुरू होते.
थॅंक्स गिव्हिंग डे डिसेंबर 2024
तिसरं कारण..
आठवणीचं तिसरं कारण तसं कनिष्ठ प्रकारचं आहे पण न चुकणारं आहे. जीवन जगत असताना सहप्रवाशी म्हणून अशी काही माणसं भेटतात की ती संगतीला पून्हा नकोच असतात.त्यांच्या आठवणीही नको वाटतात ,पण खोल गर्तेत बुडवाव्या वाटणाऱ्या आठवणी ,तीव्रतेने आठवून घडलेल्या प्रसंगाला उगीच उजाळा देत राहतात.त्यामुळे न आठवावे असेही चेहरे पिच्छा सोडवत नाहीत.
हा क्रम एका दिवसाचा वा वर्षाचा नाही तर तो संपूर्ण हयातीचा आहे.त्यामुळेच भिंतीवरचं कॅलेंडरच पान पलटवताना ,मावळत्या वर्षाला निरोप देताना अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांना घेऊन मला 2025 मध्ये जायचं आहे.काही गोष्टी पुढच्या वर्षात न्यायच्या नाहीत पण आठवणीच्या तिसऱ्या प्रकारामुळे त्या सोबत येतीलच.
आयुष्य हे दोन वर्तुळानं व्यापलेलं असतं.एक वर्तुळ असतं प्रभावाचं व दुसरं वर्तुळ असतं काळजीचं.काळजीचं वर्तुळ सातत्यानं मोठं व्हायला पाहत असतं ,त्याची त्रिज्या वाढत गेली की माणसाच्या आयुष्यावर काळी छाया गडद व्हायला लागते.याउलट प्रभावंचं वर्तुळ वाढवित गेलं तर काळजीच्या वर्तुळाच्या छायेला विरळ करता येतं.प्रभावंचं वर्तुळ वाढविण्याची कला ही आठवणीतल्या प्रकारातले पहिले दोन्ही प्रकार व स्व संस्कार ,स्व विचारधारा व स्व जडणघडण यांच्यावर अवलंबून असते.ज्याचं प्रभावाचं वर्तुळ वलयांकित त्याचं जगणंही वलयांकित ; अन्यथा अनेक काळ्या छाया माणसाला संपवू पाहत असतात. आपलं न संपतं ज्यांच्यामुळे घडलं.त्यांचे आभार मानायलाच हवेत.
माझं आयुष्य ज्यांनी सजविले ,जगविले ती बायको व गोंडस मुली ,सुखदुःखात सुख वाढवितानाचे व वेदनेला फुंकर घालणारे पाहिलेले मित्र व न पाहिलेले मित्र ,व्यावसायिक शिक्षक मित्र परिवार ,लाभलेले गुरूजन ,व ज्यांचा गुरूजी झालो ते सर्व विद्यार्थी ,सामाजिक सेवाव्रती बांधव .दुर्ग भटकंती ,प्रवास,नोकरी,सामाजिक सेवा करताना ओळखीचे झालेले सर्व यांचेही आभार.फुलाची पाकळी देणारं गणगोत,मायेचा आधार मित्र परिवार व पानाच्या आड दडलेलं काटेरी गणगोत,धोका दिलेले मित्र या सर्वांमुळेच माझ्या आयुष्याला आकार आलेला आहे.या सर्वांप्रती ऋण व्यक्त करतो.
सरलेल्या वर्षास शुभेच्छा देऊन नव्या वर्षाचे हार्दिक स्वागत करू या.सोबत असूच हा विश्वास आहे.
कचरू चांभारे बीड 9421384434
छान लेख
वर्षा चा लेख जोखा अतिशय उत्तम मांडला आहे.
Thanks dear friend
अतिशय छान लेखन व मांडणी केली आहे
Thanks bhai
खूप छान कचरू भाऊ…आपला सरत्या वर्षाचा निरोप वाचला खूप विवेचन.. खरंच आपण या पृथ्वीतलावरील सर्व मानवी जात.या सृष्टीचे आभार मानले पाहिजे..कारण आपल्याला. शुद्ध हवा पाणी.. आणि हिरवे हिरवे सुंदर वृक्ष दिले आहे… त्यांचा आनंद घेत राहिले पाहिजे नाही तर जिवन रुक्ष होईल.. अगदी खरं आहे भाऊ छान तुझं लेखन… खरंच मनात भाळणार आहे… धन्यवाद सरत्या वर्षाला निरोप नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🌷🌷🌷🙏🙏
मनपूर्वक धन्यवाद दोस्त
उत्तम लेखन… 👍
Thanks, आचार्य
सुंदर लेख
धन्यवाद दोस्त
Jabardast Sir.👍
Thanks dear friend
इंग्रज आपल्याला गुडबाय करून गेले खरे.मात्र जाताना ‘साॅरी’ आणि ‘थॅन्क्स’ हे दोन सुंदर शब्द आपल्यासाठी मागे सोडून गेले.
तसं आभारप्रदर्शन आणि क्षमायाचना या दोन्ही गोष्टी आपल्याही संस्कृतीत अगोदरपासून आहेतच.परंतु आज हे दोन शब्द आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसले आहेत.
ठेच लागल्यावर ‘आई गं’ हे उद्गार जसे अगदी सहज तोंडातून बाहेर पडतात तसेच ‘साॅरी’ आणि ‘थॅन्क्स’ हे दोन शब्द (कधी कधी पोटात नसले) तरी ओठांवर असतातच.वेळप्रसंगी हुकमाच्या एक्क्याप्रमाणे मदतीला धावून येतात.
परंतु शिष्टाचाराचा विषय वगळला तर हे शब्द नव्हे,तर कृतज्ञतेची भावना ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे.
ज्यांनी उपकार केले, केवळ त्यांचेच नाहीत परंतु ज्यांनी प्रतारणा केली,दगा दिला,विश्वासघात केला अशा सुहृदांचेही आभार मानावेत कारण प्रत्येक जण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपल्याला काही ना काही शिकवण देत असतो.
माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची मी मनःपूर्वक ऋणी आहे,आभारी आहे.
अत्यंत सुंदर लेख
Thank you so much,खूप छान अभिप्राय
खूपच छान लेख
Thank you so much
Very nice 💐
Thank you so much