नागपंचमी 9 ऑगस्ट 2024
नागपंचमी 9 ऑगस्ट 2024
नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 .श्रावण मास हा सण उत्सव व व्रत वैकल्य उपवासाची विपुलता असलेला महिना आहे.भारत हा कृषीप्रधान देश आहे व ईथले अनेक सण उत्सव शेतीशी निगडित आहेत. नागपंचमी हा सण सुद्धा शेतीशी घट्ट नातं सांगणारा आहे. श्रावण महिन्यातील पहिला मोठा सण म्हणजे नागपंचमी.श्रावणापर्यंत पाऊसधारा पिऊन धरती मुर मुर तृप्त झालेली असते.तिची ही तृप्तता बहारदार पिकांनी,हिरव्यागार सृष्टीने,खळाळत्या निर्झर नद्यांनी ओथंबून वाहताना दिसते.पेरणी,खुरपणी सारख्या कष्टाच्या कामातून शेतकरी दादा थोडा निवांत झालेला असतो.तेव्हा हा सण येतो.
नाग या शब्दाचा साप प्राण्याशी संबंध जोडून नागपंचमीला साप प्राण्याचा सण असंही प्रतिबिंबीत केलं आहे.पण काही इतिहासकारांच्या मते बौद्ध कालीन राजे हे गण तंत्र पाळणारे व पशूपालक कृषी संस्कृतीचे पाईक होते.नाग हे मानवी वंशातील प्रगत लोक होते.अनंत,वासुकी,तक्षक ,करकोटक,ऐरावत या पाच नाग राजांच्या स्मृतित नागपंचमी साजरी केली जाते.श्रीकृष्ण व कालिया मर्दन यांचा संबंधही नागपंचमीशी आहे.नगरांच्या नावात,व्यक्तींच्या नावात नाग शब्द असणं हा नाग वंशाची राज मान्यता व लोकमान्यता आहे.काळाच्या ओघात सण उत्सवाचे संदर्भ बदलत गेले. नाग प्रतिमेची पुजा करणं हा नागपंचमीचा महत्वाचा विधी आहे.
नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 अलिकडील काळात नागपंचमीचा संबंध झोक्याशी दिसून येतो.दिपावली हा सण सुद्धा खूप प्राचीन आहे व फटाके नंतर आलेले आहेत.तसंच नागपंचमी सण प्राचीध आहे ल झोका नंतर आलेला आहे. पण सध्या नागपंचमी व झोका इतके एकरूप आहेत की आपण त्यांचा वेगवेगळा विचारच करू शकत नाहीत.
नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 म्हणजे झोक्यावर बसू ,खुदू खुदु हसू किंवा वारा येई भरभर झोका जाई वर वर किंवा झुले बाई झुला माझा झुलेबाई झुला , माझा झुला झाडाला टांगला अशा झुल्याशी संबंधित कितीतरी कविता मनात तरळून जातात.
दुध का कर्ज मधला नायकाच्या बरोबरीचा साप,नागिन,नागमणी,निगाहे,शेषनाग,नगिना,हिरवा चुडा सुवासिनीचा अशा कितीतरी चित्रपटात,अनेक गाण्यांत नागाचे गारूड आहे.कथा,कादबंरीतही नाग आहे.वळण सुद्धा नागमोडी आहे.
गतिमान जीवन जगताना जीवन पद्धती थोडी बदलली आहे.सणांची संस्कृती व वारसा ग्रामीण भागात अजूनही जपला जातोय.काही संदर्भ थोडेफार बदलले आहेत.पारंपारिक सणाच्या दिवशी बालपणीची आठवण आल्याशिवाय राहात नाही.
नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 दिवशी लहान मुलांना झोक्याचे प्रचंड आकर्षण असते.काही मुले तर दोन तीन दिवसापासूनच झोके बांधतात.
नागपंचमी व नव विवाहित तरूणी यांचाही जवळचा संबंध आहे.पूर्वीच्या काळी सर्रास बालविवाह होत असत. उन्हाळ्यात लग्न उरकले की शेतीचा हंगाम सुरू होई.या धांदलील नववाहितेला माहेरी जाण्याची हक्काची संधी म्म्हणजे नागपंचमी.सुख दुःखाची देवाणघेवाण म्हणजे नागपंचमी.
परीला नवे पंख फुटल्यागत ही नव तरूणी झोक्यावर बागडते,गाते.
नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 निमित्तानं माझ्या लहानपणीच्या काही झोक्याच्या आठवणी आज हिहितो आहे. .ग्रामीण भागात त्या त्या ठिकाणाला असलेल्या नावावरून झोके ओळखले जातात.झोक्यांचे प्रचंड आकर्षण असायचे.त्या काळी म्हणजे साधारण पंचवीस तीस वर्षापूर्वीचे झोके आज असतील की नाही माहीत नाही.माझ्या मनात पिंगा घालणारा पहिला झोका म्हणजे आमच्या घराजवळील सुतारवाड्यातील झोका.माझा वर्ग मित्र एकनाथ भालेकर याच्या वाड्यातील मोठ्या लिंबाच्या झाडाला हा झोका असे.आमच्या गल्लीतील नवविवाहित माहेरवासी मुलींना इथला झोका खेळणे म्हणजे मानाचे पान वाटे.पंचमीचे पाच झोके म्हणत म्हणत कितीतरी वेळ झोके चढवले जात.मुलींच्या झुंडीच्या झुंडी इथे झोका खेळत असत.या झुंडी मग शंकर लेंडाळ (नाना) यांच्या घरासमोरील खाटीक वाड्यात यायच्या.कोण्या काळी तेथे खाटीक राहून गेला असेल आज तेथे माळी समाज वास्तव्यास आहे पण खाटीकवाडा हेच नाव कायम आहे.येसमाडीच्या झाडाला तेथे झोका असे.गावातील आणखी एक मोठा झोका म्हणजे वर्ग मित्र आप्पा भिकारी (भिकारी हे आडनाव आहे पण माझा बालमित्र आप्पा आडनावाने भिकारी असला तरी अभ्यास व ज्ञानाने खूप श्रीमंत आहे ) यांच्या घरामागील लिंबाच्या झाडाचा झोका.स्व.मोहनराव चव्हाण व स्व.भाऊसाहेब लेंडाळ यांच्या घरामागील झोकेही याच रांगेत येतात.
शाळे शेजारच्या मुस्लीम स्मशानभूमीतला झोका,बाबासाहेब पांढरे यांच्या घरामागील उतारावर असलेला मातंगवाड्यातील झोका ,ढोकीवरील लाकड्या मशिन परिसरातील लोखंडी साखळीचा झोका ,गावालगतच्या तांड्यातील नानू पवारच्या घराजवळील झोका ,बौद्ध विहाराजळील दगडू निसर्गंध यांचा झोका ,आमच्या धनगरवाड्यातील माझा चुलतभाऊ भाऊसाहेबने बांधलेला झोका,बागातील मोठा झोका असे काही झोके आजही मनात जसेच्या तसे आकाशी झेपावत आहेत.
नागपंचमी 9 ऑगस्ट 2024
झुल्याच्या निमित्तानं गावभर फिरुन यायला मिळायचे.झोका खेळून खेळून हात लाल होत असत पण मेहेंदीची लाली व झोका खेळून हात लाल झालेला या दोघांची रंग संगती इतकी परस्पर पुरक की हातालाफोड आले तरी सुखच वाटावे.आज सहज व रोजच उपलब्ध असलेली गव्हाची चपाती त्या काळी फार दुर्मिळ होती.चपाती ,आमटी भात,थोडाफार कांदा टाकून केलेले भजे ही पंचमीची सर्वोच्च मेजवाणी असे.पण पंचमीच्या दिवशी खाण्यात लक्षच नसायचे.आमचं एकच काम मस्त झोक्यावर बसून राहणे.एकट्याने तर कधी दुहेरीने झोका चढवणे.मोठे मित्र आले तर त्यांच्या पायाशी झोक्यावर बसणे.झोका चढवताना चालू झोक्यात झाडाचा पाला तोंडात तोडून आणणे .ही झोका चढविण्याची सर्वोत्तम उच्च पातळी असे.
पंचमी जवळ आली की आम्ही मित्र एकमेकांना झोका खेळायला यायचे निमंत्रणही देत असू.चोहीकडे हिरवळ ,शेतातील हिरवीगार नवजात पिके ,श्रावणात खळखळून वाहणाऱ्या नद्या ,गावातील भरगच्च झाडी ,लिंबाच्या जोडीला वड पिंपळ बाभळीचे झाडे हे निसर्गनिर्मित वैभव आमच्या पिढीने मस्त अनुभवलंय.शहरातील सण फक्त खाण्यापुरते उरलेत.
पंचमीला आलेल्या माहेरवासिनी पुढची दहा दिवस माहेरीच राहत असत व भावाला राखी बांधूनच जात असत.आता बराच बदल झालाय पंचमी झाली की लगेच बहीण सासरी जायला निघते व राखी पौर्णिमेला भाऊच बहीणीकडे उभ्या उभ्या जाऊन राखी बांधून येतो.मामाचा गाव पायाखाली घालायचा हक्काचा दिवस म्हणजे पंचमी .कथेतील मामाच्या चिरेबंदी वाड्याला आता खरोखरच चिरा पडल्यात.मामाची बायको सुगरण असायची तूप पोळी शिकरण द्यायची.दुधाचा काला कोपरापासून चाटायला मजा वाटायची.ते हातावरचे ओघळ हवेहवेसे वाटायचे.मामाची बायको सुगरण गं,जेवायला करी केळी शिकरण गं. किती मजेशीर, सुखद गीत आहे ना ते ?
नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 टांगलेला झोका मनात हिंदोळ्या घेतोय.वर खाली येताना आठवणीचे इमले वर चढवतोय.झोका बांधण्यासाठी आम्ही जेवढे आग्रही असायचो तसं आता मुलं आग्रह धरत नाहीत ही खंत आहे.
नागपंचमी सदाबहार सण आहे.सणांचे महत्व जाणून घेत समाजहिताच्या व समाजाला पोषक असलेल्या संस्कृती, परंपरांचा आपण आदर केला पाहिजे.
नागपंचमी 9 ऑगस्ट 2024
कचरू चांभारे बीड 9421384434
Kacharuchambhare.com
SUPER
Thanks dear sir
खरच खूप छान सर… जुनी निगडित महिती वाचून मिळाली.
Thanks dear sir
खूपच छान सर. तुमच्या झोक्याच्या जुन्या आठवणी सोबतच आमच्याही जुन्या आठवणी च्या झोक्यावर हिंदोळे घेता आले.
Thanks dear sir
आमच्या गावांमधील वडाच्या दोन पारंब्या मधील मोठा नाडाच्या सोलीचा दुकानदार आण्णा यांचा झोका आठवला जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.खुप आनंद झाला मन जुन्या आठवणी मध्ये रममाण झाले.
Thanks dear friend
Nice 👍
धन्यवाद सर
सर 🙏
खूपच छान लेख नागपंचमी आणि राखी पौर्णिमा… इतिहास काळातून आजपर्यंत ची माहिती..
आमच्या कडे नागपंचमी दिवशी नागपंचमी चे गाणे बिना वाध्द्य ने बाई मानस गातात..पूजा आटोपून शेतात बांधावर नागाची पूजा अर्चा करून नारळ, लाह्या,वटाने,फुटाणे यात साखर मिसळ करून ही शिर्णी चारही बांधावर शेत माऊली स द्यायचे. घरोघरी पूजा अर्चा न गावालगत मंदिर इथे पूजा करत.तो प्रसाद सर्वांना वाटून द्यावे लागे.ओला नारळ चा प्रसाद ठेवता येत नाही.या प्रसादाने च भूक जात असे.
आपना सर्वांना नागपंचमी 🐍 हार्दिक शुभेच्छा. 🙏
धन्यवाद काका
खूपच छान माहिती सांगितला तर, लेखन अप्रतिम आहे. प्राचीन नागपंचमी सणाची माहिती व नवीन माहिती यांची छान सांगड घातलेली आहे.
मनःपूर्वक धन्यवाद
Very nice.Remarkable writing.💐
मनपुर्वक धन्यवाद सर जी
अप्रतिम लेखन सर , नागपंचमी चा इतिहास काय आहे हे या लखनीतुन दाखविले आहेत , खुप छान माहीती सर , संग्रह करुन ठेवाल सर
Thanks dear friend